निवडणूक निरीक्षक यांनी केली संवेदनशील मतदान केंद्राची पाहणी :

सर्व सेक्टर अधिकारी तसेच नोडल अधिकारी यांची मार्गदर्शन पर बैठक संपन्न:

भुसावळ – रावेर लोकसभा अंतर्गत १२-भुसावळ विधानसभा मतदार संघातील आज दिनांक 27/04/2024 रोजी शहरातील चेक पोस्ट तसेच सर्वात जास्त मतदान केंद्र असलेले बूथ व पिंक बूथ तसेच संवेदनशील मतदान केंद्राची पाहणी सामान्य निवडणूक निरीक्षक यांनी केली.नंतर सर्व सेक्टर अधिकारी तसेच नोडल अधिकारी मार्गदर्शन पर बैठक प्रांत कार्यालयातील
तापी सभागृहात पार पडली
तहसीलदार भुसावळ नीता लबडे यांनी सरांचे स्वागत केले.सदरील बैठकीस रावेर लोकसभा मतदारसंघाकरिता नियुक्त सामान्य निवडणूक निरीक्षक अशोक कुमार मीना यांची विशेष उपस्थिती होती.

निवडणूक निरीक्षकांनी flying squad यांनी स्थानिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेऊन अनधिकृत बाबींची तपासणी करून कठोर कार्यवाही करावी असे सांगितले एसएसटी टीमने आपल्या नेमून दिलेल्या पोस्ट वर न राहता आपले ठिकाण बदलत राहावे अशा सूचना दिल्या.
निवडणूक सामान्य निरीक्षक यांनी मतदानपूर्वी तसेच मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशी कोणतीही घाई गडबड न करता मतदान कसे सुरळीत पार पाडावे यासाठी सेक्टर ऑफिसर यांना आपली जबाबदारी चोखपणे पार करावी हे सांगितले. सर्व झोनल अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता निवडणूक स्वच्छ,पारदर्शक व अचूकपणे पार पाडावी
ह्या सूचना दिल्या.
सेक्टर ऑफिसर यांनी सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरावे असे सांगितले.तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी पूर्वपरवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील तसेच निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर हे उपस्थित होते.