हनुमान जंयतीला मांसविक्रीची दुकाने बंद व्हावी -प्रांताधिकारी यांना निवेदन :


भुसावळ – हनुमान जंयतीला मांसविक्रीची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी याबाबत प्रांताधिकारी यांना आज निवेदन दिले .

शहरामध्ये दर वर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा आनंदाने साजरा केला जातो शहरातील काही भागात मंदीरा लगत उघड्यावर मांस विक्रीची दुकाने आहेत शहरात जागृत हनुमान व भोलेनाथ शिव मंदीर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते त्यात या दुकानांमुळे भक्तांच्या धार्मिक भावना दुखावू नये‌ यासाठी
मांसाची दुकाने बंद व्हावी शहरात अनेक भागात जागृत हनुमान व शिव मंदीर आहे येथेही मोठ्या प्रमाणात भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते रामभक्त व हनुमान भक्तांना मारुतीचे दर्शन घेतांना मंदीराचे पावित्र्य राखत देव‌दर्शन व्हावे कुठल्याही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागु नये यासाठी मांस विक्रीची दुकाने बंद व्हावी याकरिता प्रांताधिकारी यांना मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी निवेदन दिले यावेळी हनुमान भक्त , रामभक्त व गोसेवक व नागरिक उपस्थित होते .