भुसावळला निवडणूक खर्च निरीक्षक यांची भेट :


भुसावळ – रावेर लोकसभा मतदार संघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संदीपन खान यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने मतदार संघातील सर्व नोडल अधिकारी तसेच सेक्टर ऑफिसर यांची आढावा बैठक प्रांत कार्यालयात पार पडली.त्याकरिता सर्व FST, VST, VVT, SST टीमची माहिती घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच शंकाचे निरसन केले.
उमेदवाराने प्रचारा दरम्यान किती खर्च केला किंवा खर्चाची मर्यादा ओलांडली आहे का, आचारसंहितेचा भंग झाला आहे का आदि गोष्टी तपासण्याचे निर्देश दिले. सभा, रॅली बाबत परवानगी तसेच सीमेवरील चेकपोस्ट वर नियुक्त कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे व कर्तव्य काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले.
निवडणूक निरीक्षक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना उन्हापासून रक्षण करून स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेऊन कर्तव्य बजावण्याच्या सूचना दिल्या.
ह्या प्रसंगी निवडणुक निरीक्षक संदीपन खान यांचे स्वागत नायब तहसीलदार निवडणूक अंगद असटकर यांनी केले. तसेच तहसीलदार नीता लबडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रांतधिकारी जितेंद्र पाटील यांनी प्रस्तावना व आभार व्यक्त करून सभा संपल्याचे जाहीर केले