. जळगांव:- जळगाव वेतन व भविष्य निर्वाह निधीपथक (माध्यमिक) कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उघडपणे शिक्षकांकडून पैशांची मागणी केल्याचे शिक्षक संघटनांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे गान्हाणे मांडले. याप्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी सर्व शिक्षक संघटनांनी केली. त्यातच दोन दिवसांचाऊ कॅम्प झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेतन पथकाने संगणकाचा पासवर्ड बदलून टाकला. याविरोधात शिक्षक संघटनांनी वेतन पथकाचे अधीक्षक राजकुमार शर्मा यांना धारेवर धरले.
नोव्हेंबर २०१९ पासून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची विविध प्रकारची थकीत देयके प्रलंबित होती. यासाठी सातत्याने संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्याला प्रथमच १३२ कोटींचा निधी शासनाकडून मिळाला होता. मात्र, बिले प्रलंबित असतानाही वेतन पथकाकडून साडेसहा कोटींचा निधी परत पाठविल्याने शिक्षक चांगलेच आक्रमक झाले होते. ज्यांनी पैसे दिले त्यांची बिले मंजूर
वेतन पथकाने एटी झांबरे विद्यालयात दोन दिवसीय कॅम्प लावला होता. या कॅम्पदरम्यान ज्या शिक्षकांनी पैसे दिले, त्यांची कामे तत्काळ झाल्याचे शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी शर्मा यांना विचारले असता त्यांनी तसे काही नाही ज्यांनी कागदपत्रे वेळेवर दिले त्यांची बिले मंजूर झाल्याचे शर्मा यांनी सांगितले. जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठामार्फत करण्यात आलेल्या मागण्या १) सुमारे सहा कोटी 50 लाख निधी परत कसा गेला? यासाठी जबाबदार अधिकारी कर्मचारी कोण याची चौकशी होऊन कठोर कार्यवाही व्हावी.
२)..
ज्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपर्क केला व काही अर्थपूर्ण व्यवहार केले त्यांची बिले मंजूर झाली. ज्यांनी संपर्क केला नाही त्यांना कोणत्याही प्रकारची सूचना वेतन पथका मार्फत देण्यात आली नाही. वेळकाढू पणाचे धोरण राबविल्यामुळे शेकडो शिक्षक प्रलंबित बिलांपासून वंचीत राहिलेले असून सुमारे सहा कोटी पन्नास लाखाचा निधी परत गेला. ही अतिशय खेदाची बाब आहे. व म्हणून आम्ही मागणी करतो की, सदर प्रकारासाठी दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करुन कडक कारवाई करण्यात यावी. तसेच
१. सुमारे सहा कोटी पन्नास लाख निधी परत कसा गेला? यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचारी कोण याची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.
२. कोणती बिले मा. संचालक कार्यालयाने मंजूर केली ती सविस्तर यादी मंजूर रकमेसह मिळावी. या यादीनुसार मंजूर केलेल्या बिलांची व रकमेची तपासणी करण्यात यावी.
३. मा. संचालनालयाच्या परवानगी शिवाय किती बिले मंजूर केली त्यांची रकमेसह यादी मिळावी.
४. संघटनेच्या माध्यमातून रजा रोखीकरण रक्कम ही पेन्शन हेड खाली अदा करण्याचे आदेश काढण्यात आले तरीही रजा रोखीकरणाची देयके सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. काही कर्मचाऱ्यांची बिल अदा करण्यात आली. काही बिलांसाठी वारंवार पाठपुरावा करुनही बिले अदा केली जात नाहीत.
५. पी.एफ.व डी.सी.पी.एस् च्या स्लिपा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ३१ मार्च २०२१ ची भविष्य निर्वाह निधी खात्यातील कर्मचाऱ्याची शिल्लक रक्कम शालार्थ प्रणाली मध्ये टाकण्यात यावी.
६. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बिले प्रलंबित आहेत अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ज्या शाळेत कार्यरत आहेत त्या शाळांच्या मुख्याध्यापकांकडून बिल प्रलंबित असल्याचे कारणे लेखी स्वरुपात संबंधित शिक्षकांच्या अभिप्रायासह घेण्यात यावी.
वरील प्रमाणे आम्ही मागणी करीत असून चौकशी प्रसंगी आम्हांस निमंत्रित करण्यात यावे. शिक्षा अधिकारी कल्पना चव्हाण यांनी सांगितले की सदर प्रकरणाची गंभिर दखल घेऊन कडक कारवाई करण्यात यावी . दोषींवर कडक कारवाई करणार.
शिक्षक संघटनांनी वेतन पथकाच्या कारभाराविषयी केलेल्या तक्रारीनुसार वेतन पथकांच्या कार्यालयाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी ‘ बोलताना दिली.
यावेळी जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष जे.के.पाटील समन्वयक एस. डी. भिरुड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोपाळ पाटील सचिव बाळासाहेब पाटील . जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या एच. जी इंगळे , उपाध्यक्ष साधना लोखंडे जळगाव जिल्हा ज्युक्टो चे सुनील गरुड, नंदन वळींकार, शैलेश राणे, सनील सोनार, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे. शा.शि.क्रीडामहासंघ सचिव राजेश जाधव , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ .संजय निकम, इबटाचे आर.आर. धनगर, महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा संघाचे सिद्धेश्वर वाघुळदे, जळगाव शहर महानगर माध्यमिक शिक्षक संघ चे प्रदीप वाणी, सुनील तायडे, ,योगेश भोईटे, संदीप डोलारे, आर. आर. धनगर, कलाध्यापक संघाचे एम. ओ.चौधरी, अरुण सपकळे, सल्लागार आर. एच. बाविस्कर, यू, यू पाटील, संभाजी पाटील, सी. सी. वाणी, पुष्पा पाटील यांच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीआदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



