भुसावळात धाडसी घरफोडी 70 हजारांचा ऐवज लंपास : सर्वेक्षर नगरातील घटना :

भुसावळ : शहरातील संतोष माता हॉल, रींग रोड भागातील सर्वेक्षर नगरात चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत 70 हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वेक्षर नगरात इमॅन्युल गॅब्रिअल (27, सर्वेश्वर नगर, भुसावळ) हे नोकरदार कुटूंबासह वास्तव्यास आहेत. 3 ते 4 दरम्यान गॅब्रिअल बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील 25 हजार रुपये किंमतीचे लहान मुलांचे चांदीचे दागिणे, 45 हजार रुपये किंमतीची 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चैनसह 17 ग्रॅम वजनाचे दागिणे मिळून 70 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांना सूचित करण्यात आले. तपास बाजारपेठ पोलीस निरीक्षक हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.