बीना स्थानकात प्लॅटफॉर्म च्या कार्याकरिता काही गाड्या रद्द :



पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील बीना स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर धुण्यायोग्य ऍप्रनचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवास सुरु तारखांपासून रद्द केलेल्या गाड्या:-
1) ट्रेन क्रमांक 11407 पुणे- लखनौ जंक्शन एक्सप्रेस दिनांक 09.04.2024 ते 07.05.2024 पर्यंत 05 फेरी
2) ट्रेन क्र. 11408 लखनौ जंक्शन-पुणे एक्स्प्रेस दिनांक 11.04.2024 ते 09.05.2024 पर्यंत 05 फेरी
3) ट्रेन क्रमांक 12143 लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर एक्सप्रेस दिनांक 07.04.2024 ते 12.05.2024 पर्यंत 06 फेरी
4) ट्रेन क्र. 12144 सुलतानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 09.04.2024 ते 14.05.2024 पर्यंत 06 फेरी
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.