भंगार विक्रीतून मिळणाऱ्या महसूलात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भुसावळ रेल्वे विभागांत सर्वाधिक वाढ :


भुसावळ –
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य व्यवस्थापन विभागाने “शून्य भंगार” उपक्रमास गती मिळाली – विशिष्ट विक्री लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीत आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या कालावधीत, तब्बल ६२. ०६ %ने वाढ झाली आहे. भंगारातून उत्पन्न मिळवण्याच्या भुसावळ विभागाच्या दृढ प्रयत्नांना प्रभावी यश मिळाले आहे.
भुसावळ विभागाने वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रुळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स / रेल्वे डब्बे यासह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे त्या भंगाराचे उत्पन्नात रुपांतर झाले आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त करणे हे “शून्य-भंगार” उपक्रमाचा भाग आहे.
भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तब्बल ₹ ८९.४३ कोटी उत्पन्न भंगार विक्रीतून मिळवले. कमाल ₹ ५५ कोटी ठरवलेल्या विक्री उद्दिष्टाच्या तुलनेत मिळालेलं उत्पन्न तब्बल ६२.०६ % इतके उल्लेखनीय आहे .
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये विभगाने एकूण १२५०० मेट्रिक टन रेल्वे भंगाराची विक्री झाली आहे, त्याचा तपशील:-
विक्रीद्वारे देखील हे साध्य झाले आहे-

  • २० लोकोमोटिव्ह
  • ७७ वॅगन्स
    शून्य भंगार उपक्रमाअंतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे .