भुसावळ : भुसावळ विभागातील पीओएचमधील मधील रेल्वे कर्मचारी तुषार येवले वय 32 याने गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे . येवले यांना रात्रीच तात्काळ डॉ मांवतकर यांचे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते घटनेचे वृत्त पीओएच मध्ये धडकताच शुक्रवारी सकाळी तब्बल 1200 कर्मचार्यानी संबंधित अधिकारी यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करीत काम बंद आंदोलन सुरू केले दोन तासा नंतर त्या कथीत अधिकाऱ्यासवर कारवाई करणार असल्याचे आश्वासनां नंतर कर्मचार्यानी काम सुरू केले .

भुसावळातील रेल्वेच्या पीओएचमधील सिनिअर सेक्शन इंजिनिअर एस.एम.टिकोतकर यांच्या जाचाला कंटाळून रेल्वे कर्मचारी तुषार अरुण येवले (32) याने गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर रेल्वे कर्मचारी प्रचंड संतप्त झाले. शुक्रवारी या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर कर्मचार्यांनी दोषी अधिकार्यावर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केले. दरम्यान उपमुख्य कारखाना प्रबंधक आर. एस. श्रीवास्तव यांनी आंदोलक कामगारांना भेटून संबधीत अधिकार्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रेल्वे पीओएचमध्ये कर्मचारी तुषार अरुण येवले हे सेवेस आहेत मात्र त्यांच्यासह अनेक कर्मचार्यांना सिनिअर सेक्शन इंजिनिअर एस.एम.टिकोतकर यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पाचवर कर्मचार्यांना चार्जशीट दिले तर येवले यांनादेखील वारंवार त्रास दिला जात असल्याने त्यांनी गुरुवारी रात्री पत्नीला अधिकार्याकडून होणार्या त्रासाची माहिती देत आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. येवले यांची मुलगी दवाखान्यात अॅडमिट असून तिला पाहिल्यानंतर येवले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. विषप्राशन केल्यानंतर तुषार येवले यांच्यावर शहरातील डॉ. मानवतकर यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.रेल्वे सुरक्षा बल व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी डॉ. मानवतकर हॉस्पीटलमध्ये भेट दिली.



