सावदा : सावदा पोलिसांनी पाल-बोर घाटात बुधवारी रात्री अवैध वाहतूक करणार्या सहा आयशर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तब्बल 105 लहान-मोठ्या म्हशींची सुटका केली. सर्व म्हशींची सिंगतच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली असून 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या सूचनेनुसार पाल येथून जवळपास सहा गाड्यांमध्ये गुरांची अवैध गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती लोहारा दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल खोडपे यांना सूचना मिळाल्यानंतर बोर घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फॉरेस्ट चौकीजवळ या सहा गाड्यांना थांबवण्यात आले व त्यांची तपासणी केली असता त्यात काळ्या रंगाच्या म्हशी निर्दयीपणे कोंबलेल्या आढळून आल्याने संबंधित 12 आयशर गाडी मालकांना ताब्यात घेण्यात आले.
गुरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्याचे नाईक निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून जहिरखान वाहेदखान (46, रा.गंगापुरा आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), राशीद रईस कुरेशी (22, रा.गंगापुरा आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), अकबर सिकंदर खान (42, रा.सियापुरा, जिल्हा देवास, मध्यप्रदेश), वसीम रजाक कुरेशी (35, रा.गंगापुरा आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), सलमान अहेमद नूर (34, रा. पठाणवाडी सारंगपूर, जि.राजगड, मध्यप्रदेश), अफसर अबरार कुरेशी (38, रा.नजरवाडीसमोर आष्टा, जि.सिंहोर, मध्यप्रदेश), आझाद बाबू शेख (45 रा.इंटावा, जि.देवास), फारुख लतीब कुरेशी (28, रा.नेतवाडा, ता.जावर, जि. सिहोर, मध्यप्रदेश), सईद शहजाद खान (36, रा.गजरागेट चौराहा, देवास मध्यप्रदेश), परवेज सादीक बेग (22, रा.गोया, ता.नागदा, जि.देवास, मध्यप्रदेश), अमजद खान रईस खान (26, रा.अल्लीपूर आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), नजीम नईम कुरेशी (29, काजीपुरा आष्टा, जि.सिहोर (मध्यप्रदेश) या 12 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार जयराम खोडपे करीत आहे.



