सावदा –

सावदा येथे कोचुर रोडवरील रस्त्याला लागून असलेल्या शेतातील खोलीत एका ४० वर्षीय एसमाची दगडाने ठेचून हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सावदा येथे कोचुर रोडवर असलेल्या रविंद्र बेंडाळे यांच्या शेतात रखवालदार असलेल्या शोभाराम बारेला उर्फ सुरमा भोपाली वय ४० वर्षे मूळ राहणार मध्यप्रदेश याचा शेतात बांधलेल्या खोलीत रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने तोंडावर दगडाने ठेचून हत्या केली आहे.
तसेच त्याच्या छातीवर भला मोठा दगडही ठेवला आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हत्या कोणी केली? का केली. या बाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, तपासासाठी जळगाव येथून श्वान पथक मागविण्यात आले
याची माहिती मिळताच मुक्ताईनगर विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे व सहकारी यांनी घटनास्थळी धाव
घेतली तपास चक्रे फिरवली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पार्थिव हे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पोलिस स्थानकात नोंद करण्याचे आली आहे. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.
पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे सपोनी जालिंदर पळे, देवा पाटील, यशवंत खेळकर व सहकारी करीत आहेत.


