भुसावळ : कोळश्याच्या गाडीची सुरक्षा करीत असलेल्या आरपीएफ उपनिरीक्षक योगद्रसिंग महाविरसिंह व हवालदार मृगेशन सोनवणे यांच्यावर गस्तीदरम्यान शुक्रवार, 22 मार्चच्या रात्री 9.30 वाजेच्या सुमारास फेकरी शिवारातील सी कॅबीनजवळ कोळसा चोरट्यांना हल्ला केला.

जवानांनी कोळसा चोरट्यांना हटकल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक यांच्यावर कोळसा फेकून मारला. यामुळे उपनिरीक्षक यांच्या पाठीवर व अन्य ठिकाणी मार लागला. 20 ते 25 वयाच्या दोन युवकांविरूध्द भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी उपनिरीक्षक यांच्यावर रेल्वे हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास भुसावळ तालुक्याचे सहायक निरीक्षक विशाल पाटील पुढील तपास करीत आहे.


