निवडणूक पूर्व आढावा बैठकीत तहसीलदार यांनी नोडल अधिकाऱ्याना केले मार्गदर्शन :

भुसावळ – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २० रोजी आढावा बैठक घेण्यात आली या निवडणूक पूर्व आढावा बैठकीत तहसीलदार यानी नोडल अधिकाऱ्याना मार्गदर्शन केले . या बैठकीस तहसीलदार नीता लबडे व अंगद असटकर उपस्थित होते .

यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी पुन्हा एकदा सर्व मतदान केंद्राना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी असे आदेश दिले . या मतदान केंद्रावर पाणी , शौचालय , रॅम्प, फॅन , ट्युबलाईट , यांची व्यवस्था आहे कीवा नाही हे तपासण्याच्या सूचना दिल्या. एकूण 314 मतदान केंद्रापैकी 157 मतदान केंद्रावर लाइव्ह वेब कास्टिंग असणार आहे असे सांगितले , तसेच काही मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्र असतील की ज्या मध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या थिमचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगितले .

सर्वानी आपली कामे योग्य व अचूक करावी असेही यावेळी तहसीलदार नीता लबडे यांनी सांगितले . तर अंगद असटकर यांनी सर्व कामकाजाचे स्वरूप उपस्थितांना सांगून निवडणुकीस प्राधान्य देण्यासाठी अचूक कामाचे निर्देश दिले .