मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ, दीपनगर तर्फे जि प शाळेतील गरीब वंचित ३५ विद्यार्थ्याना स्कूल बॅग वाटप :


भुसावल – फेकरी परिसरातील क्रिडा क्षेत्रामध्ये राज्य स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार प्रशांत सुखदेवराव निकम व सर्प मित्रांचा सत्कार तसेच जि प शाळा फेकरी येथे परिसरातील गोर गरीब, बेरोजगार तसेच हातावर मिळेल ते काम करणाऱ्या बांधवांची मुले शिकत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत सुर्यवंशी गुरुजी यांनी मुलांना स्कूल बॅग दयाव्यात अशी मागणी संस्थेकडे केलेली होती. कारण मुलांना शासनाच्यावतीने इतर साहित्य मिळते, परंतू मुलांकडे स्कूल बॅग नाहीत. त्यामुळे बरेच विद्यार्थी गैरहजर राहतात. यासाठी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थेच्यावतीने मुलांना स्कूल बॅग वाटप करण्याचे नियोजन करून सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी चॉकलेट देखील वाटप करण्यात आले. स्कुल बॅग आणि चॉकलेट मिळाल्यामुळे मुलांना खूप आनंद झाला.

फेकरी सारख्या ग्रामीण परिसरातील खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रातील बॉक्सिंग कराटे आणि शरीर सौष्ठव स्पर्धामध्ये राज्य स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेले आहे.अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिडा युवा रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला.

सन्मानार्थी खेळाडू दिग्विजय दिलिप दाभाडे ,
राजपाल दिलिप दाभाडे , , राहुल भिमराव इखारे , महेश गोविंद निकम , गौरव सुनिल भिरूड ,. शुभम गजानन तळेकार, , मुक्ताईनगर. प्रफुल्ल रमेश निकम ,फेकरी अल्ताफ शाह (रिक्शा चालक)फेकरी. गणेश जितेंद्र कोळी
फेकरी, पूर्वेश विजय झाल्टे ,साहिल पंकज वाघ ,
रोहित राकेश काचेवार, महेश जाधव ,भव्य सत्कार करण्यात आला फेकरी सारख्या ग्रामीण भागात समाजहीतपयोगी कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा जिल्हा पातळीवर उमटवणारे प्रशांत सुखदेवराव निकम यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष
मागासवर्गीय सेल, भा ज प आणि उप सभापती
भुसावळ बोदवड तालुका शेतकरी संघ पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

फेकरी सारख्या ग्रामिण भागातून प्रचंड मेहनत जिद्द आणि चिकाटीने कराटे बॉक्सिंग शरीर सौष्ठव सारख्या खेळात प्राविण्य मिळवून राज्यस्तरावर आपले आणि आपल्या गावाचे नाव रोशन करणाऱ्या खेळाडूंचा आम्हाला अभिमान आहे. असे गौरवोदगार यावेळी संस्थापक मोहन सरदार यांनी काढले. त्यांचे प्रशिक्षक सागर निकम, दिग्विजय दाभाडे आणि प्रफुल्ल निकम यांचा देखील सत्कार सरदार यांनी करून भविष्यात सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

सर्प मित्र सत्कार
यावेळी परिसरातील सर्प मित्रांचा सत्कार करण्यात आला. रामकृष्ण कारंडे, बाबासाहेब जावळे, किरण चाटे आणि सुभाष मेश्राम या चोघांनी परिसरात निघणारे सर्प पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून त्यांना जीवनदान दिलेले आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यात मोलाचे योगदान दिले आहे. यावेळी त्यांना सर्प पकडन्याचे आधुनिक साहित्य देण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून फेकरी सरपंच चेतना भिरूड, सदस्य सुनिल बऱ्हाटे, संजय भिरूड, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. तसेच संस्थेच्यावतीने छगन पवार, स्वप्निल पाटील, प्रफुल्ल निकम उपस्थित होते. युवकांची मोठी उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.
शाळेच्यावतीने मुख्याध्यापक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून मानव सेवा ईश्वर सेवा संस्थेचे आभार मानले.