लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भुसावळमध्ये भव्य शोभायात्रा उत्साहात; सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष!

भुसावळ (प्रतिनिधी) -
भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज भुसावळ शहरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि मांगल्यामय वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. एकता, अखंडता आणि संस्कृतीचा अनोखा संगम या मिरवणुकीत पाहायला मिळाला.
अष्टभुजा देवी मंदिरापासून शोभायात्रेचा प्रारंभ
शोभायात्रेची सुरुवात शहरातील प्रसिद्ध अष्टभुजा देवी मंदिरापासून करण्यात आली. या शोभायात्रेत परिसरातील ३०० हून अधिक ह.भ.प. टाळकरी, वारकरी, संत-महंत, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार आणि कथावाचक महाराज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाळांचा गजर आणि विठ्ठलनामाच्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिनविरोध संचालक सौ. रजनीताई सावकारे, केतकीताई पाटील, भुसावळ नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्यासह शहरातील आजी-माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकर्षक सजीव देखावे
पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाड्यां ही केडी ची खांब नि सजवून  तयार करण्यात आले होते व मोटर वाहन सजवून  त्यावर  सजीव देखावे या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. यामध्ये भारताला एकसंध बांधणाऱ्या  भारतरत्न लोहपुरुष  सरदार श्री. वल्लभभाई पटेल यांचा जिवंत देखावा आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे प्रतीक असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जातं फिरवत पिठ दळताना व कविता गायनाचा सजीव देखावा पुंडलिक गणपत ब-हाटे माध्यमिक च्या शिक्षिका जयश्री चौधरी यांनी हुबेहूब साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .
 शोभायात्रा जुना सातारा परिसरातील भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल चौकात पोहोचली. तेथे सरदार पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अत्यंत आदराने विनम्र अभिवादन करण्यात आले. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
परिक्रमा करत 
या प्रसंगी उपस्थितांनी सरदार पटेल यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

 देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सरदार पटेल यांनी दिलेले योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल. त्यांचे कणखर नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि दूरदृष्टी प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला.

शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भुसावळकरांनी सर्व सहभागी वारकरी, नागरिक व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.