विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश


भुसावळ – जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार (महसुल) पंकज लोखंडे यांना सेवेतून चौकशी करून बडतर्फ करण्याकरिता विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे यांच्याकडे दि.11 मार्च 2024 रोजी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी तक्रार अर्ज दिला होता. याबाबत चौकशीचे आदेश विभागीय उपायुक्त महसुल रमेश काळे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले.
आदीवासी जागेची खरेदीविक्री हे अधिकार शासनाला असतांना तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यावल यांनी परस्पर शासनाचे अधिकार वापरून व्यवहाराची परवानगी दिली. याबाबत केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत विभागीय उपायुक्त महसुल रमेश काळे यांनी तक्रार अर्जातील नमुद मुद्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून उचित कारवाई करून अर्जदारास आपल्या स्तरावरून समर्पक उत्तर देण्यात यावे, केलेल्या कारवाईची प्रत विभागीय कार्यालयास अवलोनार्थ सादर करावी तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या स्तरावरून कार्यवाही अपेक्षित असल्यास तसा अहवाल आवश्यक त्या कागदपत्रांसह व आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह विभागीय कार्यालयास सादर करण्यात यावा, असे आदेश विभागीय उपायुक्त महसुल रमेश काळे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले आहे.