भुसावळ – लिनेस भुसावळ तर्फे गरीब व गरजू यांना खाऊ (ढोकळे) वाटप करण्यात आले .गरीब व गरजू लोकांना सुद्धा विविध खाद्य पदार्थांचा आनंद मिळावा या उद्देशाने लीनेस अध्यक्षा प्रियंका चौधरी यांनी येथील रेल्वे स्थानक परिसरात गरीब व गरजू यांना खाऊ म्हणून ढोकळे वाटप केले

यावेळी गरमागरम ढोकळा हा वेगळा खाद्यपदार्थ मिळाल्याने रेल्वेस्टेशन परिसरातील या गरिबांच्या चेह-यावर हास्य फुलले होते . यावेळी लीनेस अध्यक्षा प्रियंका चौधरी , अजित वडनेरे , मनीषा धांडे ,जया इंगळे, उज्वला पाटील , कविता महाले ,यांचेसह लीनेस पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .


