भुसावळ – दि २९ – पश्चिम बंगाल मधील संदेश खाली येथील महिलांवर होणारा अत्याचार थांबावा व पिडित महिलांना न्याय मिळावा यासाठी जनजाती सुरक्षा मंच च्या भुसावळ येथील प्रतिनिधींनी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले
संदेश खाली पश्चिम बंगालमधील उत्तरेकडील बेट असून या बेटावर बहुतांश जनजाती समाजाचे वास्तव्य आहे या समाजा वर येथील गुन्हेगारी टोळीकडून शारीरिक व मानसिक अत्याचार होत असुन यांच्या जमिनी बळजबरीने अधिग्रहित केल्या आहेत ही गुन्हेगारी टोळी महिला व मुलींना लक्ष करून त्यांच्यावर अत्याचार व बलात्कार करत आहेत हा महिलांवर होणारा क्रूर प्रकार शासनाने लक्ष घालुन थांबवावा व दोषींना कायद्या नुसार कठोरातील कठोर शिक्षा व्हावी तसेच आदिवासींच्या बळजबरीने अधिग्रहित केलेल्या जमिनी आदिवासी समाजाला परत मिळाव्या या मागणीसाठी प्रांत अधिकारी यांच्याकडे जनजाती सुरक्षा मंच भुसावळच्या सदस्यांनी निवेदन दिले

यावेळी डॉ. किशोर मोरे, काशीराम बारेला , ॲड सौ.जास्वंदी भंडारी, ॲड . सौ चित्रा आचार्य ,ॲड जयश्री देशमुख , दिनेश बारेला यांचेसह अन्य सदस्य उपस्थित होते


