भुसावळ – तालुक्यातील पिंप्रीसेकंम शिवारातील तापी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असतांना महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल यांच्या संयुक्तिक पथकाने कारवाई करीत (ता.१) फेब्रुवारी रोजी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले.

याबाबत परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भुसावळ अर्पित चव्हाण, तहसीलदार नीता लबडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या वाळूचे उत्खनन तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई चे सत्र सुरू आहे.यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल यांच्या संयुक्तिक पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
(ता.१) फेब्रुवारी रोजी भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकंम शिवारातील तापी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असतांना महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी व कोतवाल यांच्या संयुक्तिक पथकाने किरण संतोष सूर्यवंशी राहणार रामपेठ वरणगाव यांचे मालकीचे ट्रॅक्टर हे पिंप्रीसेकंम – फुलगाव च्या शेत रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडले सदर ट्रॅक्टर वाहन चालकास तहसील कार्यालयात लावण्या बाबत पथकातील कर्मचाऱ्यांनी वारंवार सूचना देऊन देखील घेऊन जात नव्हता त्यावेळी सदर ठिकाणी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे २५ ते ३० जणांचा जमाव जमा झाला याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती दिली त्यावरून तात्काळ तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी यांना मदतीस पाठवण्यात आले पोलीस कर्मचारी येताच वाहन चालकास पोलिसी हिसका दाखवताच वाहन चालक ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयात आला.
सदर कार्यवाही मध्ये मंडळ अधिकारी प्रवीण पाटील, रजनी तायडे, फिरोज खान तलाठी मिलिंद तायडे, नितीन केले कोतवाल जितेश चौधरी, जयराज भालेराव अशांनी मिळून केली.


