शिवसेना ठाकरे गटातर्फे शहरातील लोड शेडिंग व वीज बिला बाबतीत कार्यकारी अभियंता यांना निवेदन : अन्यथा महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार – इशारा

भुसावळ – शहरातील लोड शेडिंग तात्काळ थांबवावे. व दिशा एंटरप्राइज ला वेळेवर व पुरेसे कर्मचारी नेमण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा आपल्या महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल , असा खणखणीत इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुका संघटक बबलू ब-हाटे, शहर प्रमुख दिपक धांडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे
-शहरातील लोड शेडिंग व वीज बिला बाबतीत आज म. रा. वि. वि.( महावितरण)
विभाग,
शहर विभाग, कार्यकारी अभियंता, यांना निवेदन देण्यात आले .
,
भुसावळ शहरातील शिवाजी नगर,आठवले बाजार परिसर,विठ्ठल मंदिर वार्ड , वांजोळा रोड,श्री राम नगर,किंदे वाडी,केळकर हॉस्पिटल परिसर व काही भागात वारंवार लोड शेडिंग सुरू आहे. यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्यार्थी व दुकानदारांचे नुकसान होत आहे. आपल्या कार्यालयात संपर्क साधला असता वरतून लाईट बंद आहे, वरून फोन येईल तेव्हा सुरू होईल ,असे उत्तरे देतात,आता नेमक वरतून फोन म्हणजे कोणाचा फोन येतो, का वरतून मोदी साहेब फोन करता तेव्हा लाईट येते, येणाऱ्या दिवसांमध्ये गणपती उत्सव, नवराती उत्सव, दसरा ,दिवाळी असे सण आहे अशा सणांमध्ये आपल्या कार्यालयामार्फत लोड सेटिंग सुरू करण्यात आलेली आहे , बर ही लोड सेटिंग फक्त आपल्याच तालुक्यात आहे इतर ठिकाणी नाही म्हणजे ज्या तालुक्यात वीज निर्मिती केंद्र आहे त्याच तालुक्यात लोड शेडिंग हा तर आमच्या भुसावळ तालुक्यावर अन्याय आहे, ही लोड शेडिंग बंद करावी व भुसावळकरांना २४ घंटे वीज द्यावी
तसेच शहरात मीटर रिडिंग व बिल वाटपाचा ठेका दिशा एंटरप्राइज,जळगाव ला दिला आहे. सदरहू ठेकेदाराकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे वेळेवर रिडिंग घेतले जात नाही. व बिले ही वेळेवर वाटप होत नाही. त्यामुळे जास्तीचे अंदाजे रिडिंग लावून अव्वाच्या सव्वा बिल वसूल केले जाते. ग्राहकांची प्रचंड लुट होत आहे.
शहरातील लोड शेडिंग तात्काळ थांबवावे. व दिशा एंटरप्राइज ला वेळेवर व पुरेसे कर्मचारी नेमण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा आपल्या महावितरण विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. याची तात्काळ नोंद घ्यावी. या वेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,उप जिल्हा प्रमुख कैलाश लोखंडे,तालुका संघटक बबलु बाहाटे,दिलीप सुरवाडे,विधान सभा क्षेत्र प्रमुख,निलेश महाजन,युवा सेना तालुका प्रमुख सूरज पाटील,युवा सेनेचे बबलु धनगर,उप शहर प्रमुख सोनी ठाकूर,शरद जयस्वाल,योगेश बागुल,स्वप्नील सावळे,संदीप पाटील,यश फलक,मनोज पवार,पिंटू भोई,शेख महमूद,सैयद आदिक,हेमंत बाहाटे यांच्या सह शिवसैनिक उपस्थित होते