भासावळ : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दावत-ए-इस्लामी-हिंद या धार्मिक व सामाजिक संघटनने आपले देशभरातील सुमारे १७०० शैक्षणिक संस्थांमध्ये तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला, ज्यामध्ये संस्थेच्या वतीने आपल्या कल्याणकारी विभाग (GNRF) गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशमनच्या माध्यमातून ठिकठिकाणी मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले प्रशासनाच्या परवानगीने कारागृहातील कैद्यांना व रुग्णांना फळांचे वाटप केले तसेच भुसावळ येथे मदरशाच्या विद्यार्थ्यांची मोठी तिरंगा रॅली काढली हे रेली अयान टॉवर मस्जिद-कुंजल इमान अमर दीप चौक येथून सुरू होऊन रेल्वे स्थानकावरील मोठ्या तिरंग्याजवळ पोहोचली, तेथे मुलांनी देशभक्तीपर घोषणा देत गीते गायली, त्यानंतर ही रॅली विविध भागातून फिरून खडका रोडवरील रझा टॉवर येथे पोहोचली, कार्यक्रमाची सांगता झाली, ज्यामध्ये मौलाना झुल्फिकार मिसबाही साहब यांनी स्वातंत्र्यदिनी विद्वानांच्या बलिदानावर भाषण केले.
दुसरीकडे, दावत-ए-इस्लामी इंडियाचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांनी देशवासियांना विनंती केली की या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी “किमान एक रोप लावण्याची आणि त्याचे झाड बनवण्याची शपथ घेतली पाहिजे”.
शेवटी दावत-ए-इस्लामीचे जिल्हाध्यक्ष झुबेर अत्तारी यांनी जागतिक शांतता, भारताच्या विकासा आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. ही रॅली यशस्वी करण्यासाठी मौलाना साजिद हुसेन, हाफिज कासिम अत्तारी, अन्वर रजा अत्तारी, इद्रिस अत्तारी, शोएब अत्तारी, खालिद अत्तारी, आसिफ अत्तारी, इम्रान अत्तारी, सईद अत्तारी ,सईद अत्तारी यांनी व रफिक रोशन यांनी प्रयत्न केले



