भुसावळ –
मानवाच्या जिवनासाठी डॉक्टर्स देवदूत असतात त्याच प्रमाणे वृक्ष झाडे सुद्धा आपल्यासाठी देवदूतच आहेत वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे आज उष्णतेचे प्रमाण प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे ऑक्सिजनचे महत्व किती हे सर्वानी कोरोना काळात अनुभवले याकरिता वृक्ष लागवड करून संवर्धन करणे आवश्यक आहे .असे मत डॉक्टर डे च्या निमित्ताने प्रतिष्ठित डॉ .राजेश मानवतकर व डॉ . सौ मधु मानवतकर यांनी
आज व्यक्त केले .

आज डॉक्टर डे च्या निमित्ताने भुसावळ शहर पत्रकार संघ , पर्यावरण जागर प्रतिष्ठान , हरित भुसावळ स्वच्छ भुसावळ , श्रमिक पत्रकार संघ यांच्यावतीने भुसावळ शहरातील प्रतिष्ठित डॉ .राजेश मानवतकर व डॉ . सौ मधु मानवतकर यांचे वृक्ष देऊन सर्वांतर्फे सत्कार करण्यात आला सदर वृक्ष त्याचवेळी लावण्यात आले .
यावेळी डॉ मानवतकर यांनी सुद्धा उपस्थितांचे त्यांच्या शेतातील गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .
यावेळी शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर संचालक सुरेंद्र सिंग पाटील , पत्रकार संघ अध्यक्ष प्रेम परदेसी, विविध चॅनल व वर्तमानपत्रांचे पत्रकार संजय सिंग चव्हाण , उज्वला बागुल , कलीम पायलट , मनोहर लोणे , संजय काशिव आदी उपस्थित होते . यावेळी नाना पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
डॉ मानवतकर परिवारांनेही सर्वांना धन्यवाद दिले



