भुसावळ – *’पर्यावरण मैत्रिणींनी आपली संस्कृती व
परंपरा जपत तसेच पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन
करण्याची जी जबाबदारी घेत नवीन वर्षाची नवीन सुरुवात पर्यावरण पूरक हळदीकुंकू साजरे करून केली आहे
त्यानुसार सौ मंजु
सुरळकर यांचे घरी पर्यावरण पूरक हळदीकुंकू ठेवण्यात आले.
सर्व सख्यांनी काळी साडी आणि पारंपारिक दागिने
घालून कार्यक्रमास हजेरी लावली हळदीकुंकू
म्हटले की उखाणा हा आलाच… सर्व सख्यांनी पाणी, फुले,
पशुपक्षी, झाडे, दऱ्या, डोंगर असे शब्द वापरून खूपच सुंदर
असे उखाणे तयार केले. सर्वोत्कृष्ट उखाण्याला शालिनी
वाडेकर यांच्यातर्फे मेहंदी कोन देण्यात आले.
इको ब्रिक्स स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद..
कचरा न फेकता प्लास्टिक निर्मूलनासाठी इको ब्रिक्स
कॉम्पिटिशन ठेवण्यात आली होती. त्यातही भरपूर संख्यांनी
भाग घेतला ज्या सखीच्या इको ब्रिक्सचे वजन जास्त या
क्रमानुसार नंबर काढण्यात आले
प्लास्टिक
प्रथम सौ
शालिनी वाडेकर, द्वितीय सौ आरती देशपांडे, तृतीय सौ
विद्याताई पाटील, चतुर्थ सौ मंजू सुरळकर आणि पाचवा नंबर
सौ प्रियंका चौधरी हिने पटकावला. बक्षिसाचे प्रायोजक ( स्पॉन्सर) कार्याध्यक्ष सौ आरती चौधरी आहेत. पर्यावरणात
उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविका शैला सावंत यांच्या
हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व पर्यावरण सखींना
वाण म्हणून मातीचे सुगडे आणि सौ लिपिका राऊत, सौ
पूजा ढाके, सौ मंजू सुरडकर, सौ अजिता वडनेरे आणि रिता
नाईक यांनी स्वतः घरी तयार केलेली रोपे वाण म्हणून देण्यात
आली.
मंडळाच्या वतीने उपमा आणि चहाच्या जोडीने कार्यक्रमास रंगत येवून उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यात आला. सुमारे35 पर्यावरण
सख्यांनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्या
सर्व सख्यांचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार महिला पर्यावरण सखी मंच आयोजकानी मानले .



