भुसावळ – वसंत पंचमी निमित्त भुसावळ येथे नुपूर कथक डान्स अँकॅडमी चे वतीने गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी गायत्री शक्तीपीठ येथे वसंतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सुरुवातीला गायत्री मंत्राचे पठण करून कार्यक्रमाची सुरुवात हरिद्वार येथून आलेले पंडितांनी भजन सादर झाल्यावर नृत्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम नुपूर भालेराव हिने गणेश वंदना सादर केली. नंतर किंजल बारे हिने सरस्वती वंदना,तर अवनी धाडसे ,महिता सुरी,गिरिजा सावदेकर यांनी ऋतु बसंत मन भावे सखी हे सादरीकरण केले,नंतर नीलम धाडसे , सीमा पाठक, वैष्णवी बोरसे यांनी जय सरस्वती वर्दे महाराणी हे नृत्य सादर केले.या नंतर मनिशिका आरुषी,यामिनी शिंपी,हृदया सोनवणे,चंद्रजा इंगळे – हंस वहिनी द्यान दयीनी तसेच नुपूर भालेराव,मानवी नारखेडे,वृषाली लांडगे, तनिष्का पाटील,मनस्वी नगोरी, कानिका नेमाडे यांनी मा सरस्वती शारदे तर चारू भालेराव यांनी सरस्वती वंदना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या नंतर हेमांगी पांडग्रे , कींजल बाऱ्हे,स्वराली सोनवणे, लतिका श्रीखंडे यांनी संस्कृत गाण्यावर नृत्य सादर केले.या नंतर अवनी धाडसे हिने सरस्वती वंदना सादर केली. यानंतर नीलम धाडसे व सीमा पाठक यांनी ललित लवंग लता या गीतावर नृत्य सादर केले. नृत्याशिक्षिका चारू भालेराव यांनी ऋतु वसंत की या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. सहभागी सर्व कलावंतांनी एकत्र मिळून गायत्री मंत्र यावर नृत्य सादर केले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने रसिक वर्ग उपस्थित होता. सुत्रसंचलन व आभार राजेश्री देशमुख यांनी केले . यशस्वितेसाठी गायत्री शक्तीपीठ चे सर्व सेवकांनी परिश्रम घेतले. किरण फालक यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर सर्व कलावंत व रसिकांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला. वसंत पंचमीचा दिवस नृत्य सेवेने साजरा झाल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले. उस्फूर्त प्रतिसाद व उत्तम सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



