भुसावळ- शहरातील नाहाटा महाविद्यालयात पारंपारिक वेशभूष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा आणि विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. रांगोळी, चित्रकला, कोलाज , व्यंगचित्र, इन्स्टॉलेशन , क्ले मॉडेल , मेहंदी, स्पॉट स्पेटींग,फोटोग्राफी व पारंपारिक वेशभूषा यात विद्यार्थ्यांनी आपले सहभाग नोंदविला. आपल्यात असलेल्या सुप्त गुणांना कला अविष्काराद्वारे प्रस्तुत केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, संजयकुमार नाहाटा, प्रभारी प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.बी. एच.बऱ्हाटे, डॉ.ए. डी. गोस्वामी, उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विविध स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढवुन त्यांचे कौतुक केले.



