भुसावळ – भुसावळ महिला क्रिडा मंडळातर्फे तर्फे रोटरी हाॅल येथे महिलांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आजच्या काळात सौंदर्याच्या संकल्पना बदललेल्या आहेत. या अनुषंघाने 25 ते 45 वयोगटातील महिलांसाठी ब्यूटी विथ ब्रेन ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली.
यात तीन राउंड झाले. पहीला इन्ट्रोडक्शन व कॅट वाॅक दुसरा परिक्षकांचे प्रश्न व तिसरा राउंड तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात तुम्ही कसे सामोरे गेले किंवा अनुभव.
अशा राउंड मधुन विविध सौदर्यवती विजेत्या निवडल्या गेल्या.
प्रथम क्रमांक मनीषा अकोश गोस्वामी
द्वितीय पल्लवी निलेश खाचणे तृतीय हर्षिता ऋषी बेहडे
उत्तेजनार्थ प्रथम निलीमा अशोक पाटील
उत्तेजनार्थ द्वितीय निकिता सुरेश खुशलानी.
मोस्ट प्रेझेंटेबल दीपमाला उमेश चौधरी,
बेस्ट वाँक रूपाली आनंदा पाटील, मोस्ट ग्लॅमरस सारीका मनिष फालक,
बेस्ट ड्रेस हर्षिता ऋषी बेहडे, मोस्ट फोटोजेनीक विजया अशोक पाटील, काॅन्फीडंट पर्सनॅलिटी मनिषा अकोश गोस्वामी,
मोस्ट ब्युटीफुल स्माईल विजया अशोक पाटील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा आरती चौधरी यांनी केले व कार्यक्रमाचा उद्देश महिलांमधे आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे हे सांगितले महिलांनी आपला रंग, दिसणे याबाबत कोणताही न्यूनगंड बाळगू नये. .
प्रमुख पाहुणे राजलक्ष्मी देशपांडे यांनी महिलांना मन, बुध्दी, व शरीर यांच्या समन्वयाने सुंदर व्यक्तीमत्व बनते असे सांगितले स्वतः विकसित करण्याकडे लक्ष दिले पाहिजे .
या कार्यक्रमासाठी भुसावळमधील प्रतिष्ठीत महिला उपस्थित होत्या त्यामधे डाॅ. वंदना वाघचौरे, पत्रकार उज्ज्वला बागुल, भाग्यश्री भंगाळे हजर होते. पाहूण्यांची ओळख प्रोजेक्ट चेअरमन स्वाती भोळे यांनी केली.
परिक्षक डॉ. सुषमा खानापूरकर. डॉ. सरोज शुक्ला व सौ. वानखेडे होत्या.
महिला क्रिडा मंडळच्या
अध्यक्षा आरती चौधरी, सेक्रेटरी लता होसकोटे, उपाध्यक्ष स्वाती नाईक, प्रो. चेअरमन स्वाती भोळे, कावेरी चौधरी,श्रध्दा सराफ,प्रा. नीता चोरडीया, प्रिता पिंगळे, प्रमीला नेमाडे, भारती चव्हाण, अनिता कवडीवाले, माधुरी गव्हाळे, विनीता नेवे, वैशाली पाटील, प्राची राणे, संजीवनी पिंगळे, किरण शुक्ला, वैशाली भगत, मंगला पाटील, सुनिता पाचपांडे हजर होते.
सुत्रसंचलन राजश्री देशमुख यांनी केले
आभार कावेरी चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आले.
एक वेगळा व छान कार्यक्रम घेतल्या बद्दल उपस्थित महिलांनी सौ आरती चौधरीं व महिला क्रिडा मंडळाचे भरभरुन कौतूक केले



