भुसावळ – लहान मुलांचे अपहरण करणारी कोणतीही टोळी शहर व परिसरात नाही तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नका. याउलटअशी काही माहीती मिळाल्यास तातडीने संबंधित पोलीस ठाण्यास संपर्क साधा सोशल मिडीयाचे माध्यमातून जर कोणी अफवा फैलवत असतील तर अफवा फैलवणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पो नि राहुल गायकवाड यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये दिला .
मागील काही दिवसापासुन व्हाटसअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली किंवा चोर आले.
अशा प्रकारच्या अफवा फिरत आहे. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडुन
बहुरुपी, वाटसरु, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले
आहेत. त्यातुन अशा जमावर गंभीर गुन्हे देखील झाले आहेत. सध्या भुसावळ शहरात
परीसरात अशा अफवा पसरविल्या जात असुन लोकांचे मनात भिती पसरली असल्याचे
निदर्शनास आले आहे. यासाठी शहरातील व परीसरातील नागरीकांना पोलीस प्रशासनाचे वतीने जनतेस आवाहन
करण्यात येते की,अफवांवर विश्वास ठेवु नका. अशी काही माहीती मिळाल्यास तातडीने
पोलीस ठाण्यास संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नांव
पोलीसांना कळवावे. बातमीची खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला
कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फारवर्ड करु नये.
सोशल मिडयातुन आलेल्या मॅसेजवर डोळे झाकुन विश्वास ठेवु नका.अफवा
परविणा-या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलीसांचे लक्ष आहे. अफवा पसरविल्यास
आपणावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडुन आपल्या
हातुन गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लोकांनी स्वताहुन
कायदा हातात घेवु नये.कायदा व सुव्यस्था आबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन
भुसावळ बाजारपेठ पोस्टेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले आहे .



