१

भुसावळ – मागील दोन वर्षांमध्ये कोरोना मुळे अनेक विद्यार्थी १० वी, आणि १२ वीच्या परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म नंबर १७ म्हणजेच (खाजगी विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र) विभागीय मंडळामार्फत स्वीकारले जातात. कोरोना काळामध्ये बरेचसे विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याकारणाने परीक्षा देऊ शकलेले नाहीत म्हणून यावर्षी सन २०२२-२३ करिता खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतून परीक्षा देण्यास इच्छुक आहेत, परंतु प्रत्येक शाळेला कमाल मर्यादा म्हणून फक्त ५० विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र स्वीकारण्याची तरतूद विभागीय मंडळामार्फत करण्यात आलेली आहे.
परिसरातील काही नामांकित खाजगी शाळा या विद्यार्थ्यांचे म्हणजेच खाजगी विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्यास टाळाटाळ करतात. इतर काही शाळा या विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्यास तयार असतात परंतु तेथे कमाल मर्यादा ५० असल्याकारणाने इतर विद्यार्थी आवेदन पत्र भरण्यापासून वंचित राहत आहेत. एकीकडे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे नाही आणि दुसरीकडे या विद्यार्थ्यांची मानसिक पिळवणूक होत असते गेल्या दोन वर्षांमध्ये अश्याच प्रकारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे.
विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना ठेवत शाळांना खाजगी विद्यार्थी कोटा वाढून मिळावा अशी पालकांची मागणी आहे.


