भुसावळ – येथील रहिवासी व सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथील प्रा. जितेंद्र दगडूगीर महंत यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मार्फत राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जे सानिपीना राव (इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन) आंध्रप्रदेश हे होते त्यांच्या हस्ते प्रा जे डी महंत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी पुणे येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. श्री शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर (सुप्रसिद्ध विचारवंत) प्रमुख पाहुणे होते. पुरस्कारांमध्ये त्यांना सन्मानचिन्ह, गौरव पदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच, व मानाचा पुणेरी फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते .

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रा. जे.डी.महंत यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तर्फे त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे तसेच सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्यु. कॉलेज मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी मार्फत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सर्व स्तरातून प्राध्यापक जे डी महंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


