भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी ‘एक दिवस माझ्यासाठी ‘ उपक्रम संपन्न : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न :

भुसावळ- येथील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे तालुक्यातील अंगणवाडी सेविकां व मदतनीस यांच्या करीता एक दिवस माझ्या साठी कार्यक्रम दिनांक 4 रोजी माळी भवन येथे संपन्न झाला
.या कार्यक्रमात महिलांनीं उत्साहाने सहभाग घेतला मंडळा तर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ पोस्टर स्पर्धा, संगीत खुर्ची,हाऊझी गेम,वेगवेगळे गमतीशीर प्रश्न मंजुषा व 5 लकी ड्रॉ मध्ये महिलांची आवडती पैठणी लता राणे, माधुरी भोळे, राधिका अनिल पाटील, शालिनी वाणी यांना देण्यात आली.
नेहमी शासनाने दिलेल्या कामात व्यस्त असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या कार्यक्रमात मनसोक्त आनंद घेतला.डॉ मनीषा दावलभक्त महिलांना स्त्री आरोग्या वर महिलांना मार्गदर्शन केले,माधुरी गुर्जर यांनी स्त्रियांना व्यायाम किती गरजे चे आहे हे सांगितले..भुसावळ चे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी 13ऑगस्ट ते 15ऑगस्ट पर्यंत “हर घर तिरंगा “बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली व आवाहन केले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्ष पदी डॉ मनीषा दावलभक्त प्रमुख पाहुणे पिंकेथोन च्या माधुरी गुजर ,वसुंधरा जायंट गृपच्या अध्यक्षा महानंदा पाटील, परीक्षक जयश्री चौधरी, गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी , रेखा गायकवाड (सीडीपीओ ) तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे सचिव लता ताई सोनावणे उपस्थित होते.
जयश्री दवे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.तर आभार बोरीकर मॅडम यांनी केले.रेखा गायकवाड यांनी प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी यांचे या आनंदमयी कार्यक्रमासाठी विशेष धन्यवाद दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंडळाच्या सदस्यता सौ अनिता आंबेकर,सौ मनीषा काकडे,सौ वैशाली भदाणे,कुमारी पूजा पाटील,
भुसावळ ग्रामीणच्या पर्यवेक्षिका जयश्री जोशी,अनुपमा बोरीकर,शोभा जाधव
,संध्या रोझतकर,शहराच्या पर्यवेक्षिका यांनी सहकार्य केले.