जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न : प्रतिष्ठा महिला मंडळ व पर्यावरण सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत महिलांचा पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मान :


भुसावळ – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळ व पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
सकाळी तापी नदी परिसरातील अन्नपूर्णा मातेच्या मंदिर परिसरात वड व पिंपळ या धार्मिक व वैज्ञानीक दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.सौ नूतन फालक व हिरामन फालक यांनी वृक्ष संवर्धनाची जवाबदारी घेतली.त्यांचे मंडळा तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे झालेल्या पर्यावरणची हानी व पुढील धोके लक्षात घेता त्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या शैला सावंत त्यांनी उपस्थित सर्वाना वृक्षांचे महत्व,घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्याचा वापर करून कंपोस्ट खत कसे तयार करावे त्याचे मार्गदर्शन करून टेरेस गार्डन संकल्पना सांगितली.
महत्वाचे म्हणचे प्लास्टिक कॅरीबँगचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा या वर विशेष भर दिला व सर्वांना एक साडी कापडी पिशव्या बनविण्यासाठी द्यावी असे आवाहन केले.त्याला प्रतिसाद देत बऱ्याच महिलांनी साड्या देण्याचे मनोगत व्यक्त केले.प्लास्टिक निर्मूलन करिता भारुड सादर केले व पत्रक वाटप केले.
मंडळाच्या वतीने आपापली पारिवारिक व इतर जवाबदारी सांभाळून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या महिलांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रमाणापत्र, शॉल व रोप देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये पुरस्कार्थी महिलां डॉ.मनिषाताई दावलभक्त
गेल्या कित्येक वर्षांपासून ओल्या सुक्या करचर्या चे वर्गीकरण करून कम्पोस्ट खत तयार करून गच्ची वर सुंदर बाग फुलावली आहे तसेच भुसावळ शहरातील जवळ पास 150 ते 200 लोकांचा ग्रुप तयार करून सर्वाना किचन गार्डनींग चे मार्गदर्शन करतात व ऑनलाइन ऑफलाईन व्याख्यान देऊन काचर्या पासून खत निर्मिती व किचन गार्डनींग संबघी मार्गदर्शन देतात..
शीतल भराडीया —-
इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा असून त्यांनी प्लास्टिकच्या खाली बाटल्या जमा केले त्यात क्लब मेम्बर्स व इतरांना घरातील वेस्ट प्लास्टिक कचरा भरून त्या बाटल्यांचा वापर करून रोटरी भवन च्या परिसर मध्ये कम्पाउंड तयार केले ,तसेच विसावा गार्डन ची निर्मिती केली ,पर्यावरण पूरक उपक्रम घेतले.
नूतन फालक—–
तापी नदी परिसरातील अन्नपूर्णा मातेच्या मंदिर परिसरात पति हिरामण फालक च्या मदतीने विविध वृक्षांचे संवर्धन करून परिसर विकसित केला तसेच झाडांना पाणी मिळावे त्या साठी पाण्याची टाकी बसवून परिसर हरित केला कापडी पिशव्यांचे वाटप करतात व इतरांना पण प्रेरित करून आपले योगदान दिले…
राधा झंवर—
माहेश्वरी महिला मंडळ च्या जिल्हाध्यक्ष असून किचन वेस्ट पासून बायो एंझाईम तयार केले मंडळातील सदस्य व इतर संस्थांना वयक्तिक जाऊन माहिती देऊन त्यांना पण बायोएंझाईम तयार करायला प्रेरित केले त्याचा वापर वाहत्या नदी मध्ये टाकून जल प्रदूषण मुक्ती चा संदेश दिला….तसेच त्यांच्या वापर किचन गार्डनींग मध्ये कसा होतो त्याची माहिती देतात…
सुनंदा औंधकर—–
वयाची कुठेही अट न मानता अविरत पणे पर्यावरण संवर्धनासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण तर केलेच पण ती जगविण्यासाठी निरंतर प्रयत्न करतात.पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडे लावून संवर्धन करतात..इतरांना प्रेरित करतात .
सौ आरती चौधरी ——
पर्यावरण सखी मंचच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली सिड बॅंक ची निर्मिती केली.वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करतात..गेल्या कित्येक वर्षांपासून कचऱ्यापासून खत निर्मिती करतात..विविध बियांपासून रोपे तयार करून वाटतात..
या वितरित पर्यावरण सखी मंचच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी कार्य करणाऱ्या पर्यावरण सखींचे मनोबल वाढविण्यासाठी व पुढली कार्या साठी प्रोत्साहित करण्यासाठी पर्यावरण मित्र पुरस्कार प्रमाणपत्र व शॉल देऊन सत्कार करण्यात आला*पर्यावरण सखीं
सुजाता सरोदे,मनीषा निकम,सारिका फालक,शालिनी वाडेकर, सुरेखा पाटील अंजली वाघमारे, स्वाती भोळे, विद्या पाटील,रेखा सोनवणे,अनधा कुलकर्णी, मीना ढाके, जया बजाज,वर्षा लोखंडे.प्रमुख वक्त्या शैला सावंत यांच्या तर्फे उपस्थित सर्वांना कापडी पिशव्यांचे वाटाप करण्यात आले.
व प्लास्टिक निर्मुलन करिता आपल्या परीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष व पर्यावरण सखी मंच महाराष्ट्र राज्य तज्ञ मार्गदर्शक सौ रजनी सावकारे यांनी केले. पुढील वर्षा पासून *पर्यावरण मित्र पुरस्कार* मोठ्या स्तरावर घेऊन पर्यावरण संवर्धन साठी कार्य करणार्या सर्व संस्था, बंधू व भगिनींना सन्मानित करण्यात येईल असे सांगितले. संचालन सौ वर्षा लोखंडे यांनी केले व आभार प्रदर्शन सरला सावकारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यावरण सखी मंच महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक सौ महानंदा पाटील,अंजली वाधमारे,मीना राजपूत,सुरेखा तायडे,मंदाकिनी केदारे,सौ मनीषा काकडे,लता सोनवणे, सौ श्रद्धा चौधरी, सौ मीनाक्षी पिंपळे,सौ वैशाली भदाणे,पूजा व सर्व सदस्यांनी सहकार्य केले .