भुसावळ – प्रशिक्षण घ्या हया मागणीसाठी शिक्षक व त्यांच्या संघटनांनी आंदोलन केल्यानंतर अखेर शासनाने दि.1जून पासून माध्यमिक शाळांतील शिक्षकांन साठी ऑन लाईन सेवांतर्गत प्रशिक्षण सुरू तर केले पण त्याचा पूर्ण फज्जा उडाला. एक तर हे प्रशिक्षण गेल्या सात वर्षांपासून घेतलेच नाही त्यामुळे आधीच अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत शिवाय हयाही प्रशिक्षणाचे वारा वाजले आहेत . नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असाच काहीसा प्रकार झाला. पास वर्ड, लॉगिन होत नाही,internal server error असे मेसेज येत आहेत. काही ठिकाणी नेट वर्क चाहि प्रॉब्लेम येत आहे. खर म्हणजे प्रशिक्षण ऑन लाईन घेण्याचा अट्टाहास कश्यासाठी? आधी आमचे प्रशिक्षण आयोजित करा म्हणून शिक्षकांना आरडाओरड करावी लागली. नंतर शासनाने ते करू पण त्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये नोंदणी फी आकारली. ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली पण अद्याप शासन मौन धरून आहे. खर तर प्रशिक्षण न घेताही शिक्षकांना वरीष्ठ व निवड श्रेणी दिली असती तर काय आकाश कोसळले असते? प्रशिक्षण घेतल्याने काय मोठी क्रांती होणार आहे? यापूर्वीच्या प्रशिक्षणाचे काय अनुभव आहेत? मग हवाच कशाला प्रशिक्षणाचा हट्ट? विशेष म्हणजे गेल्या सात वर्षांत एकही प्रशिक्षण शासनाने आयोजित केले नाही हया कालावधीत अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेत त्यांच्या बाबतीत आता काय निर्णय घेणार? आणि हेच प्रशिक्षण जून च्या पहिल्या आठवड्यात व तेही ऑफ लाईन घ्यायला कोणती अडचण होती? पण कोणी निंदा कोणी वंदा कसेही निर्णय घेणे हाच आमचा वसा; हाच शासनाचा उपक्रम दिसतो. ऑन लाईन मध्ये अडचणी कमी आहेत काय? आणि ह्याची जाणीव वरीष्ठ अधिकाऱ्यांक ना नाही का? आणि नसेल तर तेच मुळात अकार्यक्षम असेसमजून त्यांचेसाठीच खरे तर एक प्रशिक्षण घ्यायला हवे. असे नाही का वाटतं?असा रोख ठोक सवाल ज्येष्ठ शिक्षक नेते तथा भा. ज. पा. शिक्षक आघाडी चे राज्य कार्यकारिणी सदस्य प्र. ह. दलाल यांनी केला आहे.



