महिला कामगारांच्या वेळेच्या मर्यादेचा यूपी सरकारचा कठोर निर्णय महाराष्ट्रात लागू करा :- शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

भुसावळ:- महिला कामगारांच्या वेळेच्या मर्यादेचा यूपी सरकारचा कठोर निर्णय महाराष्ट्रात लागू करा अशी मागणी शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महिला कामगारांना सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही असा एक आदेशनुकताच उत्तर प्रदेश सरकारने काढला आहे.उत्तर प्रदेश सरकारने या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील महिला कामगारांना त्यांच्या लेखी संमतीशिवाय सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. आदेशानुसार, या कालावधीत महिला कामगार काम करत असल्यास, तिला मोफत वाहतूक आणि भोजन दिले जाईल.त्याचवेळी, कामाच्या ठिकाणाजवळ शौचालये आणि इतर सुविधांची खात्री करण्याच्या सूचनाही मालकांना देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा महाराष्ट्रातील महिला मजूर कामगार यांच्यासाठी सुद्धा अशाच नियम असलेला आदेश त्वरित काढावा. व महिला सक्षमीकरण सबलीकरणाची चळवळ प्रगल्भ करावी जेणेकरून त्यांची कामाच्या ठिकाणी होणारी पिळवणूक, छळ थांबून. एक आदर्श जीवन त्यांना व्यतीत करता येईल आणि आपल्या कुटुंबाला तुमचा पुरेपूर वेळ देता येईल
म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने त्वरित उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार या आदेशानुसारच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्वरित युद्धपातळीवर महिला कामगार मजुरांना हा नियम लागू करून न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.