भुसावळ – शहरातील सिंधी कॉलनीत सिंधी समाजाचे इष्टदैवत श्री. भगवान झूलेलाल मंदिराचे नुतनीकरणाच्या कामाचे भुमीपूजन शुक्रवारी झाले. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी उभारणी कार्यासाठी एक किलो शुध्द चांदीची विट श्री. भगवान झुलेलाल यांच्या चरणी अर्पण केली.

जिल्ह्यात सर्वांत मोठे श्री. भगवान झुलेलाल मंदिर भुसावळातील सिंधी कॉलनीत आहे. या मंदिराचे नुतनीकरण व हॉल, १० हॉल उभारणी कामाचे भुमीपूजन शुक्रवारी (दि.१) झाले. यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, माजी नगरसेवक रमेश नागराणी, माजी नगरसेविका पुष्पा बतरा, सामाजिक कार्यकर्ते अजय नागराणी, प्रकाश बतरा, अध्यक्ष नारायणदास छाबडीया, मनोहर सोडाई, जॉनी मेघानी, कन्हैय्यालाल आहूजा, अजय माखीजा, सिरवानी सर, प्रल्हाद तलरेजा, सुनीलबाबा उदासी, पितांबर टेकवानी, बाबा हंसराज किशोर कारडा, बाबा नागदेव, आदींसह व्यापारी उपस्थित होते. मंदिराच्या उभारणी कार्यासाठी प्रभाग २० चे माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी १ किलो चांदीची विट श्री. भगवान झुलेलाल महाराजांच्या चरणी अर्पण केली. यापूर्वी देखील मंदिराच्या परिसरात नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी स्वखर्चातून ११ लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसविले आहे ..



