घटनात्मक अधिकाराचा योग्य उपयोग झाल्यास उत्तम आणि सक्षम सरकार निर्मिती शक्य… प्रा डॉ सचिन जी नांद्रे.

  भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा  योजना आणि विद्यार्थी विकास विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिवस झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे धुळे जिल्हा समन्वयक प्रा डॉ सचिन जे नांद्रे प्रमुख पाहुणे म्हणून तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 
  प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा डॉ सचिन नांद्रे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व नागरिकांना दिलेल्या घटनात्मक अधिकाराचा सुयोग्य वापर केल्यास देशात उत्तम आणि सक्षम सरकार निर्मिती सहज शक्य आहे. तसेच शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढल्यास लोकशाही अधिक बळकट होईल. त्या सोबत च देशाच्या विविध भागातील आणि क्षेत्रातील वंचित आणि अशिक्षित समाजातील मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न झाले पाहिजेत. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी लोकशाहीचे महत्त्व स्पष्ट करीत लोकशाही मधील सामान्य माणसाची शासन निर्मिती मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असून मतदान ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे मतदानाचा दिवस सुटी म्हणून साजरा न करता त्या दिवशी मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावून सुयोग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदान करावे असे आवाहन केले. 
 कार्यक्रमाचे सुरुवातीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी दिलेल्या नमुन्यातील शपथ घेतली गेली. ही शपथ प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जी पी वाघुळदे यांनी तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ जगदीश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीेतेसाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा निर्मला वानखेडे, प्रा अनिल सावळे, यांनी सहकार्य केले. कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ जयश्री सरोदे,  प्रा डॉ संजय चौधरी,प्रा एस डी चौधरी, प्रा ए जी नेमाडे, प्रा डॉ आर बी ढाके या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते