भुसावळ – शहरातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ग्रामीण भागातून गोरगरीब विद्यार्थी तंत्रशिक्षणासाठी येतात. नुकत्याच आता वार्षिक परिक्षा सुरु होत आहे , त्यानुसार या विद्यार्थ्यांना स्थानिक परिक्षा केंद्र ऐवजी दुसऱ्या शहरांमध्ये परिक्षा केंद्र देण्यात आले आहे. मात्र
सद्यस्थितीत रेल्वे आणि बस वाहतुक बंद असून, विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही अश्या परिस्थितीत सापडलेल्या या विद्यार्थ्यानी शहर किंवा तालुक्यात परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी करीत संतप्त होवून आज ता. ३ रोजी येथील शासकीय आयटीआय मध्ये हॉल तिकीट जाळून आंदोलन केले.
शहरात जामनेर रोडवर शासकीय आयटीआय केंद्र आहे. याठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांची आता वार्षिक परिक्षा होणार आहे. , शहरात इतरही खाजगी आयटीआय आहेत तेव्हा या ठिकाणी परिक्षा केंद्राची व्यवस्था होवू शकते मग सुविधा सुद्धा असताना दुसऱ्या शहरात परिक्षा केंद्र देण्यात आले आहेत. या अगोदर शहरातील परीक्षा केंद्रांमध्येच परीक्षा घेण्यात आल्या आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस वाहतुक बंद आहे. तर कोरोना लॉकडाऊन काळापासून रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी दररोज खाजगी वाहनाने १०० किमी प्रवास करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
त्यामुळे या कोरोना सदृश्य परिस्थितीत व बस सपाचे काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेवून शहर किंवा तालुक्यात परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी सर्व विद्यार्थ्यानी यावेळी केली आहे.



