जर सावित्रीबाई नसत्या तर आज या व्यासपीठावर उपस्थित राहूंन बोलू शकले नसते – अँड.जास्वंदी भंडारी : भुसावळात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी ; अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजमधे विनम्र अभिवादन ;

भुसावळ – ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते स्त्री शिक्षणा पासून आणि स्वातंत्र्या पासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी व पराधीन ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला.
1 जानेवारी 1848 साली ज्योतीबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकविण्यास धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलींना शिकवू लागल्या.
आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असे,
पण जर सावित्री बाई नसत्या तर आज या व्यासपीठावर उपस्थित राहूंन बोलू शकले नसते ,
असे प्रतिपादन अँड जास्वंदी भंडारी यांनी या वेळी उपस्थित विद्यार्थ्यासमोर केले.
आर्या फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात आप आपल्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या सावित्रीच्या लेकी उपस्थित होत्या. त्यात सक्षम कौन्सिलच्या सौ आरती चौधरी, मानवतकर हॉस्पिटलच्या डॉ मधु मानवतकर , अर्पण हॉस्पिटलच्या डॉ सुवर्णा गाडेकर, आदीं उपस्थित होते .

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले . यावेळी सर्व सावित्रीच्या लेकिनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सावित्री बाईचां जीवनपट उलागडत मार्गदर्शन केले,
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक
अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्य सौ मनीषा बाविस्कर यांनी केले तर सूत्रसंचलन विद्यार्थी ऐश्वर्या सुरवाड़े यांनी केले, व आभार डॉ वंदना वाघचौरे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी
पौर्णिमा पाटिल ,प्रजावती तायड़े,सायली,अश्विनी निकम भाग्यश्री, नकुल थोसर ,शहीद प्रफुल भट यांनी परीश्रम घेतले.