गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गपर्यंतचा रस्ता पालिकेने रेल्वेस हस्तांतर करू नये – सभेमध्ये अजेंड्यावर घेतलेल्या या विषयाला नगरसेवकांचा विरोध ;

भुसावळ (प्रतिनिधी) गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गपर्यंतचा रस्ता पालिकेने रेल्वेस हस्तांतर करू नये, सभेमध्ये अजेंड्यावर घेतलेल्या या विषयाला नगरसेवकांचा विरोध आहे, असे भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक उल्हास पगारे यांनी सांगितले. यावेळी पालिका राष्ट्रवादी गटनेते दुर्गेश ठावूâर, नगरसेवक राहुल बोरसे, इम्तियाज शेख, आशिख खान, शिवंâदर खान, तम्मा पहिलवान, रवींद्र भालेराव, काँग्रेस शहाराध्यक्ष रवींद्र निकम, इकबाल बागवान, सचिन पाटील, ललीत मराठे आदी उपस्थित होते.
परिषदेत पुढे बोलतांना नगरसेवक उल्हास पगारे, इम्तियाज शेख म्हणाले की, भुसावळ पालिकेची आज २७ रोजी सभा आयोजित करणात आली आहे. सभेच्या अजेड्यामध्ये विषय क्र.१६९ गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गपर्यतचा रस्ता मध्य रेल्वे प्रशासनास हस्तांतरीत करणे बाबतचा विषय बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आला आहे. विषय हा धोरणात्मक असून या अगोदरच्या सभेमध्ये देखील विषय मांडण्यात आला असून त्यावर आक्षेप घेतल्यानंतर हा विषय वगळण्यात आला होता. वास्तविक २०१९ मध्ये रेल्वे प्रशासनाने अनाधिकृतपणे या रस्त्यालगत असलेले दुकाने तोडली. तसेच रस्त्याच्या आजुबाजुला तारेची व भिंतीचे कंपाऊड तयार केले. त्यावेळी नगरपालिका प्रशासन यानी हरकत घेण्याऐवजी बघ्याची भुमीका घेऊन गोरगरिबांवर होणाNया अन्यायाला समर्थन असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील नुकसानग्रस्त नागरिकानी सदरचे प्रकरण उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहे, अश्या परिस्थिती या विषया बाबत कोणताही निर्णय घेणे म्हणजे कोर्टाचा अवमान केल्यासारखे होईल. रेल्वे सदर रस्ता हा रेल्वे प्रशासनास हस्तांतरीत केल्यास रेल्वे प्रशासन सदर रस्ता हा प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत करील व तसे झाल्यास कंडारी गाव, दिपनगर, नालंदा नगर, रूपवते हौसिंग सोसायटी, ऑर्डन्स फॉक्टरी, समता नगर, कवाडे नगर आदी भागातील रहिवाशाना ये-जा करण्यासाठी मज्जाव करील यात शंका नाही. कारण या अगोदर रेल्वे प्रशासनाने लाल चर्च ते नगर पालिका फिल्टर हाऊसकडे जाण्याचा मार्ग बंद आहे. तसेच तापी नगरकडे फिरावयास जाण्यासाठी देखील बंदी केली आहे. रस्ता रेल्वे प्रशासनास हस्तांतर केल्यास रस्त्यालगत असणाNया दुकानांपासून मिळणाNया करास कायम स्वरूपी मुकावे लागणार आहे, असे यावेळी नगरसेवक उल्हास पगारे, इम्तियाज शेख, रवींद्र निकम व इतर नगरसेवकांनी सांगितले. तसेच लोकहितास्तव हा रस्ता कोणत्या सबबीवर रेल्वे प्रशासनास हस्तांतरीत करू नये, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलने व निर्दशने करण्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवकांनी दिला आहे.