तालुक्यातील वरणगांव मधील मजुरी करणारे व शेतमजुर नागरिकांचे रेशन कार्ड महसूल विभागाने केले बंद ; भाजपाचा भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी :

भुसावळ – तालुक्यातील वरणगांव मधील मजुरी करणारे व शेतमजुर नागरिकांचे रेशन कार्ड महाविकास आघाडी सरकारने महसूल विभागाला सांगून बंद केले असून धान्य सुद्धा बंद करण्यात आले आहे.यासाठी भाजपाने बऱ्याच वेळा आंदोलने केली.मात्र प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.वरणगांवच्या नागरिकांना वेठीस धरून मजुरांचे धान्य बंद केल्याने गुरुवार रोजी वरणगांव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ तहसील कार्यालयात मोर्चा आणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करून परिसर दणाणून सोडला.

सविस्तर वृत्त असे की, वरणगावतील नागरिकांना वेठीस धरून रेशनिंग कार्ड बंद केले आहे ते तत्काळ सुरू करण्यात यावे तसेच धान्य वाटप करण्यात यावेे.संजय गांधी,इंदिरा गांधी असे अनेक प्रकारच्या योजना तसेच ह्यातीचा दाखल घेऊन भुसावळ तहसील कार्यालयामध्ये यावे लागते हे नागरिकांना शक्य नसल्याने वरणगांव मध्ये तहसीलची उपशाखेचे स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले पाहिजे असे प्रकारचे विविध मागण्यांसाठी आजरोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिला व पुरुषांच्या उपस्थित भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यानंतर.दिपक धिवरे तहसीलदार भुसावळ यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल विभाग गरिबांचे रेशनिंग कार्ड बंद करून त्यांचे नावाचे धान्य काळ्या बाजारात विकत असून महाविकास आघाडी सरकार हे हप्ते वसुली,खंडणीखोर सरकार असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी केला.आठ दिवसांच्या आत नागरिकांचे रेशनिंग कार्ड सुरू करून धान्य न दिल्यास भारतीय जनता पार्टी वरणगांव मध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा दिला आहे.