भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली ;

भुसावळ — भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्या विद्यापीठाने २७/१२/२०१९ रोजी दिलेल्या पत्रानुसार आता डॉ. मंगला साबद्रा या प्राचार्य पदावर नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे .

येथील श्रीमती पी .के .कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांच्या प्राचार्य पदाची दिं.०७/०२/२०१७ रोजी, पाच वर्ष सावधी कालावधी सेवा पूर्ण झाल्यानंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३०/०६/२०१० च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार/नियमानुसार, संस्थेने निवड समिती बोलवून दिं.०८/०२/२०१७ रोजी त्यांची पुनर्नियुक्ती अथवा दुसर्‍या प्राचार्याची नेमणूक करायला पाहिजे होती. मात्र संस्थेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता, त्यांनाच त्या पदावर पूर्ववत ठेवले.
ही बेकायदेशीर बाब, सामाजिक कार्यकर्ते कुंदन धर्मा तायडे व श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या संस्थापक सदस्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व धडाडीच्या नेत्या सौ. जयश्री न्याती आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. दिनेश राठी यांच्या लक्षात आल्यानंतर, यां सर्वांनी, या बाबतची तक्रार उमवि विद्यापीठ ,यु.जी.सी.,शिक्षण सहसंचालक व शासनाकडे केली. त्यानंतर विद्यापीठाने, प्र-कुलगुरू प्रा.डाँ. प्रमोद पी.माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीने सखोल चौकशी करून अहवाल दिला होता. त्या अहवालाच्या आधारे विद्यापीठाने दि २७/१२/२०१९ रोजी, प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांची मान्यता रद्द केली होती व संस्थेला योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र या निर्णयाच्या विरुद्ध सरस्वती विद्या प्रसारक मंडळ (संस्था) व प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा यांनी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या विरुद्ध औरंगाबाद ऊच्च न्यायालयात दि ०६/०२/२०२० रोजी याचिका (क्र.५२३/२०२०) दाखल केली . या याचिकेत सौ.जयश्री न्याती यांनी सुध्दा ईन्टरव्हिनर म्हणुन भाग घेतला होता. त्यांच्या वतीने अँड.शंभुराजे देशमुख यांनी बाजु मांडली.
दि. २५/१०/२०२१ रोजी मा. न्यायालयाने, याचिकेतील ज्या काही कार्यालयीन त्रुटी (ऑफिस ऑब्जेक्शन) होत्या, त्या काढून टाकण्याबाबत निर्देश दिले होते. तसेच, मा.न्यायमूर्ती श्री. रवींद्रजी व्ही. घुगे व न्यायमूर्ती श्री. एस.जी.मेहरे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळेस सदर बाब ही तातडीची म्हणून नमूद करून ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दि २९/१०/२०२१ पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा दि ३०/१०/२०२१ या दिवशी याचिका फेटाळली जाईल असे स्पष्ट निर्देश दिले होते .
याचिकाकर्ते यांनी न्यायालयाच्या या निर्देशाची दखल न घेतल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात आलेली असुन, आता संस्था, विद्यापिठ,शिक्षण सहसंचालक काय भुमिका घेतात. याकडे शिक्षण क्षेत्रातील धुरीणांचे लक्ष आहे. न्यायालयीन आदेशानुसार डॉ मंगला साबद्रा यांची याचिका फेटाळली गेलेली असल्याने, विद्यापीठाने २७/१२/२०१९ रोजी दिलेल्या पत्रानुसार आता डॉ. मंगला साबद्रा या प्राचार्य पदावर राहिलेल्या नाहीत.