भुसावळात विवाहितेला धमकी देत अत्याचार; संशयिताला अटक


भुसावळ – शहरातील एका भागात राहणाऱ्या तीस वर्षीय विवाहितेला मुलाचे अपहरण करण्याची व पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एकास अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बाजार पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहिता आपल्या पती व मुलासह राहते. गेल्या वर्षी २०२० च्या रमजान महिन्यापासून ते सप्टेंबर २०२१ महिन्यापर्यंत संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम उर्फ जम्मू ई याने विवाहितेला तिच्या मुलाच्या अपहरणाची धमकी व पतीला जिवेठार मारण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केले. मुलाच्या अपहरणाची धमकी व पतीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने तिने घाबरून त्यावेळी याबाबत तक्रार केली नाही. दरम्यान विवाहितेच्या पतीने दिलेली हिम्मत व आधारामुळे पीडित महिलेने संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम याच्याविरूद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन करीत आहे.