भुसावळात ताप्ती व्हॅली तर्फे पोलिसांची मधुमेह तपासणी ;


भुसावळ – हृदय दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व रोट ट्रॅक क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली यांचेतर्फे दहा लाख नागरिकांचा मधुमेह चाचणी करण्याचे उद्दिष्ट आहे . या अनुषंघाने भुसावळ येथे जवळपास पाचशे नागरिकांची चाचणी करण्यात आली . पोलीस विभागातील कर्मचारी आणि पदाधिकारी यांची प्रथमतः चाचणी करण्यात आली . कार्यक्रमास भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची चाचणी करून उद्घाटन झाले.पोलीस विभागा नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रिक्षाचालक व सामान्य नागरिक सुद्धा चाचणी केेली.
सदर चाचणी घेण्यासाठी अध्ययन प्यारा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व त्यांच्या संचालिका डॉक्टर वंदना वाघचौरे
आयोजन रोटर ट्रॅक्टर व रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष डॉली दुधानी व डॉ संजू भटकर सदर शिबिरास सीए मुकेश अग्रवाल डी आर आर लोकेश कँसल, सुमित यावलकर, निखिल बोंडे, हर्षल वानखेडे, आयपीपी शुभम झोपे आदीं मान्यवत उपस्थित होते .