बोदवड येथे दुकान फोडून ६ लाखांची रोकड लंपास: चोरटे सीसीटीव्हीत कैद :

बोदवड – येथील भुसावळ ते बोदवड रोडवरील बडगुजर ट्रेडर्स नावाच्या बिल्डिंग मटेरियल सप्लायचे दुकान अज्ञात चोरटयांनी दि. २६ च्या रात्री ते दि. २७ रोजीच्या पाहटे फोडता ६ लाख रुपयांची रोकडा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात चोरीचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ बोदवड रोडवर प्रमोद सुरेश बडगुजर यांच्या मालकीचे बडगुजर बिल्डिंग मटेरियल सप्लायचे दुकान असून दि. २६ रोजी रात्री ७ ते दि. २७ रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी दुकानाच्या शटर तोडून आता प्रवेश करत काउंटरच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ६ लाख रुपयांची रोकड घेऊन पोवारा केला. दुकानात चोरी झाल्याचे सकाळी लक्षात येताच प्रमोद बडगुजर यांनी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुध्द्व गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक एस. एस. माळी करीत आहे. दरम्यान, चोरीची घटना सीसीटीवी कॅमेरात कैद झाली असून पोलीस त्या अनुषंघाने तपास करीत आहे.