प्रभात कॉलनी, रिंग रोड, भुसावळ येथील संकटमोचन हनुमान मंदिरात आज शनिवारी अधिक मास (पुरुषोत्तम मास) तसेच १११ व्या हनुमान चालीसा पठणानिमित्त भक्तिमय वातावरणात आंबा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मंदिरात उपस्थित सर्व भक्तांच्या सहकार्याने श्री हनुमान चरणी ५०१ हून अधिक आंब्यांचा महाप्रसाद अर्पण करण्यात आला. हनुमान चालीसा पठण, पूजा-अर्चना आणि धार्मिक कार्यक्रमांनंतर महाप्रसादाचे विधिवत पूजन करण्यात आले.
यानंतर उपस्थित भाविकांना आंब्याच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने आणि जय श्रीराम, जय हनुमानच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
आंबा महोत्सवाच्या आयोजनासाठी मंदिर समिती व सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संकटमोचन हनुमान मंदिरात आंबा महोत्सव उत्साहात; ५०१ आंब्यांचा महाप्रसाद अर्पण
भुसावळ : प्रभात कॉलनी, रिंग रोड, भुसावळ येथील संकटमोचन हनुमान मंदिरात आज शनिवारी अधिक मास (पुरुषोत्तम मास) तसेच १११ व्या हनुमान चालीसा पठणानिमित्त भक्तिमय वातावरणात आंबा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.