विवाहीतेची आत्महत्या ; पतीसह दोघां विरोधात गुन्हा दाखल : पतीस अटक :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील पिंपंगाव खु॥ येथील महिला ज्योती अनिल सपकाळे या विवाहीतीने शनिवार दि ३१ रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती .
दरम्यान तीच्या माहेरच्या मंडळींनी पती , सासु व ननंद यांच्यावर आरोप करीत तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी या तीघा
विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पतीस अटक करण्यात आली आहे

या बाबत पोलीसानी दिलेल्यां माहितीनुसार असे की तालुक्यातील पिंपळगाव खु ॥ येथील  महिला ज्योती अनिल सपकाळे ( ३५ ) या विवाहीतीने शनिवार दि ३१ रोजी आपल्या राहत्या घराच्या पत्राच्या ऍगला सुताच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दुपारी दिड वाजेच्या सुमारास उघडकीस आली .दरम्यान  शवविच्छेदन करून अंत्यविधि करण्यात आला . परंतू तीच्या माहेरच्या मंडळींना तीचे  पती अनिल वसंत सपकाळे ,सासु शकुतला वंसत सपकाळे,  व ननंद योगीता गजानन सोनवणे यांच्यावर संशय होता त्यांनी आरोप केला की तीचा पती हा नेहमी तीच्या चारित्र्यवर संशय घेऊन मारहाण करीत होता तर  सासु व ननंद या  मानसिक व शारीरीक त्रास देऊन तीचा छळ करीत होते . या तीघानी तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने योगिताने आत्महत्या केल्या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला  सुर्यधन आंबादास कोळी रा रिंगाव ता मुक्ताईनगर याच्या फिर्यादी नुसार पती  , सासु व ननंद यांच्या विरोधात भा द वी कलम ३०६ , ४९८ , अ , ५०४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन मयत महिलेचा पती अनिल सपकाळे याला त्वरीत  अटक करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मनोहर पाटील हे करीत आहे