जिथे गरज असते तिथे रोटरी पोहचते डॉ. आनंद झुनझुनवाला : रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली पदग्रहण समारंभ संपन्न :

भुसावळ
रोटरी क्लब ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. जगातून पोलिओ निर्मूलन करण्यामधे रोटरीचे मोठे योगदान आहे. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्य नव्हे तर वैयक्तिक विकासा सोबतच मैत्री जपण्याचे कार्य केले जात असते. रोटरी सदस्यांच्या वर्गणी मधून हे कार्य सुरू असते. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्या सोबतच आपण दान करत असतो. याकरिता रोटरी मध्ये जास्तीत जास्त सदस्य सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जगामध्ये कुठेही जिथे गरज असते तेथे रोटरी पोहोचत असल्याचे प्रतिपादन डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी केले

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली चे पदग्रहण समारंभाचे आयोजन बालाजी लॉन येथे करण्यात आले होते यावेळी आमदार संजय सावकारे माजी प्रांतपाल राजेश मोर अध्यक्ष डॉ. संजू भटकर सचिव जीवन महाजन माजी अध्यक्ष सुधाकर सनंसे माजी सचिव राम पंजाबी माजी प्रांतपाल राजीव शर्मा इनरव्हील क्लब चे डॉ. रश्मी शर्मा रोटरॅक्ट डीडीआर लोकेश कांसल, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी चे अध्यक्ष हरविंदरसिंग थेटी, सचिव आशिष अग्रवाल, माजी अध्यक्ष संदिप जोशी, ईनरव्हील क्लब रेलसिटी चे अध्यक्ष वंदिता पारे आदी उपस्थित होते
यावेळी माजी प्रांतपाल राजेश मोर यांनी प्रांतपाल रमेश मेहेर यांचा संदेश वाचताना सांगितले की आरोग्य, शेतकरी व महिला सक्षमीकरणासाठी रोटरी क्लब ने पुढाकार घेतला पाहिजे या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचे काम येणाऱ्या वर्षभरामध्ये करायचे आहे यासाठी क्लबच्या प्रत्येक सदस्याने सहभागी होऊन हे कार्य पूर्णत्वास करण्यासाठी हातभार लावायचा आहे.

डायलिसिस सेंटर सुरू करणार
कोरोना काळामध्ये रूग्णांवर ती उपचार व्हावे यासाठी ट्रामा सेंटर मध्ये रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली व रोटरी क्लब ऑफ भुसावल रेल सिटी या दोघांनी ऑक्सिजन प्रणाली बसवल्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले त्याच पद्धतीने आता शासनाच्या व रोटरी क्लब च्या मदतीने भुसावळात डायलिसिस सेंटर सुरू करण्यावर ती भर आहे व हे कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न ,सर्वांनी करायचा आहे.
संजय सावकारे आमदार

शिक्षण आरोग्य व पर्यावरणावर काम करणार
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी पर्यावरण संवंर्धन करणे गरजेचे आहे. तसेच शिक्षणा सोबतच आरोग्यवर देखील लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली च्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरात विविध कार्यक्रमाची आखणी करताना शिक्षण, आरोग्य, व पर्यावरण संवर्धनासाठी जास्तीचे प्रयत्न असणार आहे.
डॉ. संजू भटकर, अध्यक्ष

बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढील प्रमाणे
अध्यक्ष डॉ. संजू भटकर, माजी अध्यक्ष सुधाकर सनंसे, भावी अध्यक्ष नुतन फालक, सचिव जीवन महाजन, खजीनदार सुनिल वानखेडे, टिआरएफ चेअर डॉ. रश्मी शर्मा, मेंम्बरशिप चेअर डॉ.सुधिर शर्मा, पब्लीक इमेज चेअर योगेश इंगळे, सर्व्हीस प्रोजेक्ट चेअर समाधान जाधव, युथ सर्व्हीस चेअर किशोर पाचपांडे, जॉईंट सेक्रेटरी प्रदिप सोनवणे, सार्जट अॅटआरम्स मुकेश अग्रवाल

यांना दिले सदस्यत्व –
आर.आर. बावस्कर, बापू चौधरी, राहुल सोनार, विवेक पाटील, मनिषा पाटील,मिना नेरकर, सतिष जंगले, राजेंद्र आवटे, ललित चौधरी, संजय रायपुरे, प्रशांत नरवाडे, एम.आर.चौधरी, संतोष सोनवणे, आर.बी.इंगळे,डॉ.पंकज पाटील,

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिल वानखेडे यांनी तर आभार नुतन फालक यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी धर्मेद्र मेंडकी, डॉ.सुधिर शर्मा, सुनील शिरनामे , डॉ. वंदना वाघचौरे, आदिल खान, आदिंनी परिश्रम घेतले.

.