भुसावळ : यावलमधील जगदीश कवडीवाले यांच्या सराफ दुकानावर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील संशयीत आरोपी मुकेश प्रकाश भालेराव यास भुसावळ तालुका पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली .

अटके नंतर त्याने तालुका पोलीस ठाण्यातील शौचालयात जावून अंगावर धारदार काचेने वार करून घेतल्याची घटना शुक्रवार, 30 जुलै रोजी 7.40 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.
या प्रकरणी संशयीत मुकेश भालेरावविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


