साईनगर शिर्डी – हावडा विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – सीयालदह विशेष गाड्यांना मुदतवाढ :


भुसावळ –
१) साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद साप्ताहिक

02593 साईनगर शिर्डी – हावडा विशेष अतिजलद दि. ७.८.२०२१ पासून २.१०.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल.

02594 हावडा – साईनगर शिर्डी विशेष अतिजलद यापुढे दि. ५.८.२०२१ पासून ३०.९.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल.

02594/02593 विशेष च्या विस्तारित फेऱ्या विद्यमान संरचना, वेळ आणि थांब्यांनुसार चालविण्यात येतील.

२) लोकमान्य टिळक टर्मिनस – सीयालदह विशेष साप्ताहिक सुधारित वेळांसह

03180 लोकमान्य टिळक टर्मिनस – सीयालदह विशेष दि. १०.८.२०२१ पासून दि. २८.९.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल.

03179 सियालदह – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ८.८.२०२१ पासून २६.९.२०२१ पर्यंत चालविण्यात येईल.

03180/03179 च्या विस्तारित फेऱ्या विद्यमान संरचना, थांब्यांनुसार तर सुधारित वेळ व धावण्याचे दिवस खालीलप्रमाणे असतील:

03180 दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.४० वाजता सुटेल आणि सीयालदह येथे तिसर्‍या दिवशी सकाळी ०९.०० वाजता पोहोचेल.
03179 प्रत्येक रविवारी १८.३० वाजता सियालदह येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल.

आरक्षण : 02593 आणि 03180 या विशेष गाड्यांच्या विशेष वाढीव फे-यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. ३१.७.२०२१ पासून सुरू होईल.

वरील अतिजलद विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा

बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्वच निकष, एसओपी यांचे पालन करावे लागेल. विशेष अतिजलद ट्रेनमध्ये बसण्यासाठी कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच परवानगी देण्यात येईल.