जळगाव –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवार रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जळगाव जिल्हा शहर व ग्रामीण विभागाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील प्रश्न व पक्षसंघटना बळकट करण्याबाबतच्या उपयोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, जळगाव ग्रामीण आढावा बैठकीत आ अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी खासदार वसंतकाका मोरे,भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी महीला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवि पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनावणे, जळगाव शहर बैठकीत जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, निरीक्षक अविनाश आदिक, प्रदेश पदाधिकारी नामदेव चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय वंजारी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय वंजारी, एजाज गफ्फार मलिक तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


