भुसावळातील पालीका प्रशासनासह नगरसेवक यांचेकडून नागरी सुविधा मिळत नसल्याने येणा-या निवडणुकीत मतदानावर शेकडो रहीवाशी बहीष्कार टाकणार – जिल्हाधिकारी यांना रहीवाश्यांचे निवेदन सादर :

भुसावळ –
नगर पालीका भुसावळ यांचे कडून नागरी सुविधा मिळत
नसल्याने येणा-या नगर
पालीका निवडनुकीत मतदानावर
रहीवाशांचा बहीष्कार करण्यात येणार असल्याचा इशारा येथील शिवशक्ती हुडको कॉलनी जामनेर रोड परिसरातील रहीवाशी यानीं निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना दिला .
शिवशक्त्ती हुडको कॉलनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्रधिकारण
नाशिक यांचे अंतर्गत अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न
गट अशा सर्व नागरिकांच्या सोई करिता बांधण्यात आलेली वसाहत आहे.
सदर वसाहतीस आज रोजी 27 वर्षे पुर्ण होवूनही येथिल नागरीक नगर
पालीकेच्या नागरी सुवीधांपासून वंचीत आहे. विशेष म्हणजे ज्या सुवीधा म्हाडा
ने 27 वर्षापुर्वी स्थानिक नागरीकांना दिल्या होत्या त्याच सुवीधा जशाच्या
तशा आहेत. नगर पालीकेकडून -गरिकांना मागील 27 वर्षांपासून साधे
रस्तेही मिळालेले नाही व कोणत्याच नागरी सुवीधा दिलेल्या नाही.
नगर पालीका भुसावळ मागील 27 वर्षापासून शिवशक्ती हुडको कॉलनी
जामनेर रोड भुसावळ येथील रहीवाशांकडून भरघोस कर वसूल करत आहे.
दर पाच वर्षांनी कराच्या रकमेत 10 टवके करवाढ होवूनही आम्ही सर्व
सुवीधांपासून वंचीत आहोत. आमच्या कडून जो कर वसूल केला जातो त्या
करापासून जर आम्हाला नागरी सुवीधा मिळत नसतील तर तो कर आम्ही का
म्हणून भरावा?, नगर पालीका अधिकारीकडे या बाबत विचारणा केली,
बरेचदा अर्ज दिले तर आम्हाला सांगण्यात आले की म्हाडाने हुडकोचा कार्यभार
नगर पालीके कडे हॅन्डओव्हर केलेला नाही असे उत्तर मिळते. जर म्हाडाने
नगर पालीकेकडे कार्यभार हॅन्ड ओव्हर केला नाही तर गेल्या 27 वर्षापासून
कशाचा कर आकारला जातोय याचे कोणतेही स्पष्टीकरण नगर पालीकेने
दिलेले नाही. आमच्या म्हाडा कॉलनी नंतर भुसावळात आणखी म्हाडा
कॉलनी झाल्या तेथे रस्ते आहे मग 27 वर्षे जुनी कॉलनीच हॅन्डओव्हर केली
नसेल का? खरे तर नगर पालीका आणि नगर सेवक यांनी दुर्लक्ष केल्यामुळे
आम्हाला कोणत्याही नागरी सुवीधा मिळालेल्या नाही. आम्ही भार सहन करून
शहरात अगदी झोपडपट्टीत देखील रीमेंट कॉक्रीट रस्ते आहेत आम्ही मात्र
कायम उपेक्षीत आहोत.
हुडको कॉलनी आणि परीसरात कधी सफाई कर्मचारी येत नाही तरी
देखील आमचे कडून साफसफाई कर आकारला जातो. तसेच शहरात कोठेही नगर पालेके मार्फत वृक्ष लागवड होत नाही तरी वृक्ष कर आकारला जातो.
नगर पालीकेच्या बहुतांशी शाळा ‘द स्थितीत आहे तरीही शिक्षण कर
आकारला जातोय. शिवशक्ती हुडकलिनीत गटारी नाही अंडरग्राउंड ड्रेनेज
सिस्टीम आहे ती 27 वर्षे जुनी असल्याने किठिकाणी पाईप चोकअप होताय
त्याचा खर्च रहीवाशांना स्वखर्चाने करावा लागतोय. वस्तीत कित्येक पथदिवे
बंद स्वरूपात आहे तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नाही. शिवशक्ती
हुडको कॉलनीला लागून इंदीरानगर झोपडपही आहे ते लोक सर्रास उघड्यावर
शौचास बसतात ती दुर्गधी आणि अनारोग्य आम्ही मागील 27 वर्षापासून
अनुभवतोय. आम्ही या पुर्वी नगर पालीकेकडे दिनांक 17/12/2020 रोजी
लेखी तक्रार कली आहे पण कारवाई मात्र शुन्य झाली आहे.
शिवशक्ती हुडको कॉलनी प्रभाग 21 मध्ये येते या प्रभागाला नावाला दोन
नगर सेवक आहेत पण ते ढुंकूनही लक्ष देत नाही. पाण्याची समस्या आमच्या
पाचवीला पुजली आहे. दर आठ दिवसांनी पाणी पुरवठा होणार असे केवळ
आश्वासन आहे प्रत्यक्षात पंधरा वीस दिवसांनी विनवणी केल्यावरं पाणी पुरवठा
होतो. पाण्याच्या समस्ये करीता नगर पालीका कधीही नागरीकांना टँकरने पाणी
पुरवठा करत नाही आम्हाला 800 रूा : खर्चुन पाण्याचा टॅकर मागवावा लागतो.
नॅशनल हायवे नं.6 चे काम वस्तीला लागून चालू आहे मागील दोन वर्षापासून
त्यांच्या मुळे पाईप फुटणे, पाईपलाईन जडणे ‘ मुद्दाम उशिर करणे, रहीवाशांना
दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने सपूर्ण रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले
आहे. सद्यपरिस्थीतीत पावसाळा आहे पाणी भरपूर उपलब्ध आहे पण पाण्याचे
नियोजन शुन्य असल्याने पावसाचे पाणी वाहून जात आहे तरीही आम्हाला
पाणीपुरवठा करण्यात नगर पालीका असमर्थ आहे. शहरात सुमारे 75 वर्षापासुनची
पाणी फिल्टर योजना आहे. गेल्या 75 वर्षात भुसावळ शहर दहापट मोठे झाले
आणि योजना तीच असल्याने नागरीकांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अमृत योजना पाच वर्षापुर्वी आणली दोन वर्षात काम पुर्ण होईल असे आश्वासन
नागरीकांना दिले पण प्रत्यक्षात पाच वर्षे उलटूनही योजना अपूर्णच आहे. जागोजागी
खोदकाम, विखूरलेले रस्ते, या मुळे संपूर्ण रहीवाशी त्रस्त आहेत. झिरो गार्बेज सिटी म्हणवणा-या भुसावळ शहराची दशा उकीरड्यापेक्षा वेगळी नाही.
स्थानिक नगर पालीका भुसावळ यांची फक्त पाणी पुरवठ्याची सुवीधा
महिन्यातून चार वेळा मिळते त्यामुळे केवळ पाणीपट्टीच आकारण्यात यावी. ज्या
सुवीधा आम्ही उपभोगतच नाही त्याचा कर आम्ही का भरावा?
या निवेदनाव्दारे शिवशक्ती हुडको कॉलनी जामनेर रोड भुसावळ
रहीवाशी असे घोषीत करतो की,
अ) आम्हाला कॉलनीतील अंतर्गत रस्ते, नियीमत व स्वच्छ पाणी पुरवठा
क) कचरा कुंड्या व नियीमत कचरा उचलणारी घंटागाडी येणे
ड) उघड्यावर शौचास बसणा-यावर कारवाई व्हावी
इ) कॉलनीचे पथदिवे रात्रीचे सुमारास चालू ठेवणे आणि बंद पथदिवे
त्वरीत बदलणे
या सर्व नागरी सुवीधा मिळे पावेतो नगर पालीका कर न भरण्याचा आणि
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणा-या निवडनूकीवर बहीष्कार टाकण्याची घोषणा करत आहोत. सन 2021-2022 च्या नगर पालीका निवडणूकीत
आमचे रहीवाशी संघातून कोणीही मतदान करणार नाही. तसेच जो पर्यन्त
रहीवाशांना हक्काच्या नागरी सुवीधा मिळत नाही तो पर्यन्त स्थनिक
प्रशासनाला कोणतेही सहकार्य न करण्याचा ठाम निर्धार करत आहोत.
जिल्हयाचे पालक या नात्याने जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडून सर्वतोपरी
समर्थन व न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. आपण आमच्या अर्जाची योग्य
दखल घेवून शिवशक्ती हुडको कॉलनी जामनेर रोड भुसावळ रहीवाशांना रस्ते,
पाणी, दिवाबत्ती, सफाई, तत्सम सुवीधा नगर पालीका भुसावळ कडून उपलब्ध करून देण्यात सहकार्य कराल अशी माफक अपेक्षाही व्यक्त केली आहे .
दरम्यान
जो पर्यंत या प्रभागातील समस्या निवारण होणार नाही तो पर्यंत मतदानावर बहिष्कार असणार असा इशारा देण्यात आला .
दर पंचवार्षिकला मत मागन्यास उमेदवार येतात त्यानंतर चेहरा ही दाखवत नाही प्रभागातील जुने प्राचीन रानातला महादेव मंदिर सुद्धा सुविधा पासुन वंचित आहे .सध्या कार्यरत नगरसेवक फक्त त्यांच्याच सिंधी कॉलनी भागाची सुधारणा करीत आहे मात्र या भागात फीरकत देखील नाही असे आरोप नागरिकांनी केले
सदर निवेदन पालकमंत्री , मुख्याधिकारी , तसेच संबंधित अधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती अँड जास्वन्दी भंडारी यांचेसह परिसरातील नागरिकांनी सायंकाळी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली . यावेळी नागरिकांच्यावतीने प्रतिनिधित्व अँड जास्वन्दी भंडारी , डॉ यावलकर,
नेहा यावलकर, सुनिता राणे, उत्कर्ष भंडारी, प्रतिक्षा राणे, अँड निलेश भंडारी, डॉ सुनिल राणे , यांचेसह नागरिक उपस्थित होते
.