रावेर पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांनी घेतली आढावा बैठक


रावेर : आढावा बैठकीत कारणे नको तर कामे दाखवा, असे म्हणत गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी उपस्थित ग्रामसेवकांची चांगलीच झपाई केली. यावेळी दिलेल्या वेळेत कामे पूर्ण न करणार्‍या ग्रामसेवकाला नोटीसा देण्याचे फर्मान बैठकीत गटविकास अधिकारी कोतवाल यांनी दिले. रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांची बुधवारी पंचायत समिती हॉलमध्ये गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी आढावा बैठक घेतली. यामध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा क्रमांक दोनवर मार्गदर्शन केले. कृषी पीक कापणी, अपूर्ण घरकुले, ड यादी, आधार कार्ड अपडेट करणे, जॉब कार्ड मॅपिंग करणे आदी विषयात ढिलाईपणा करणार्‍या ग्राम सेवकांची गट विकास अधिकारी कोतवाल यांनी झपाई केली. या बैठकीला विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे सधांशु आदी ग्रामसेवक उपस्थित होते.